श्री कॉम्प्युटर्समध्ये नावनोंदणी व अर्ज भरण्याची सुविधा
गुहागर, ता. 16 : सारथी पुणे व एमकेसीएल पुणे यांच्या द्वारे छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉनक्रिमिलेअर गटाच्या युवकांसाठी नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. Computer skill training by Sarathi
गुहागर शहरातील श्री कॉम्प्युटर्स या संस्थेत विविध संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रम 1 फेब्रुवारीपासून खुले होणार आहेत. 16 जानेवारीपासून याची नाव नोंदणी सुरु झालेली आहे. Computer skill training by Sarathi
हे प्रशिक्षण पुर्णत: नि:शुल्क असून मराठा, कुणबी समाजातील तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. 10 वी ते 15 वी (पदवी) पर्यंत उत्तीर्ण असलेल्या 18 ते 45 मधील नॉनक्रिमिलेअर गटाच्या उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येईल. नाव नोंदणी करीता उमेदवारांनी अध्ययन केंद्राकडे (श्री कॉम्प्युटर्स) मुळ कागदपत्रांसह स्व खर्चाने उपस्थित रहाणे आवश्यक आहे. Computer skill training by Sarathi
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना फोटोसहीत शैक्षणिक गुणपत्र, किमान 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, जातीचा दाखला, जन्मदाखला, ३ वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, डोमेसाईल सर्टीफिकेट, आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. Computer skill training by Sarathi
अर्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासाठी निवडले जाईल. ज्या उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल अशांची नावे www.mkcl.org/csmsdeep या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील. Computer skill training by Sarathi
अधिक माहितीसाठी श्री कॉम्प्युटर्स, पंचायत समिती समोर, गुहागर (संपर्क क्रमांक 9764790639, 9421137039 या ठिकाणी संपर्क साधावा. नाव नोंदणीची सर्व प्रक्रिया या संस्थेमध्ये देखील पूर्ण करता येईल. Computer skill training by Sarathi