• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संगणक कक्षाचे उद्घाटन

by Ganesh Dhanawade
December 24, 2022
in Ratnagiri
81 1
0
Computer Room in English Medium School
159
SHARES
453
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 :  चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान, इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संगणक कक्ष अनावरण व उद्‌घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी ‘श्रीकांत गद्रे संगणक कक्ष फलकाचे अनावरण व संगणक कक्ष विभागाचे उदघाटन श्रीमती अनुराधा गद्रे यांच्याहस्ते करण्यात आले. Computer Room in English Medium School

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

यावेळी उदघाटक श्रीमती अनुराधा गद्रे, प्रमुख अतिथी लेफ्टनंट कर्नल अद्वैत गद्रे, श्रीमती हेमलता जोशी, श्रीमती दिना गद्रे, संस्थेचे डॉ विवेक नातू, डॉ. विकास नातू, सौ. निला नातू, संस्थेच्या सर्व शाळांतील मुख्याध्यापक यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर श्रीकांत गद्रे यांच्या सेवाभावी जीवनकार्याची माहिती देण्यात आली. प्रास्ताविकामधून इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका कृतिका सोहनी यांनी इंग्लिश मिडीयम स्कूलची यशस्वी वाटचालीची माहिती दिली व संगणक कक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल गद्रे परिवाराचे आभार मानले. Computer Room in English Medium School

संस्थेच्या देवखेरकी शाळेतील मुख्याध्यापक अनंत साळवी यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा दैदिप्यमान विविधांगी उपक्रमांचा व कार्याचा उल्लेख करीत संस्थेचे अध्यक्ष डॉ विनय नातू व सर्व पदाधिकाऱ्यांचे योगदान विशद केले. प्रमुख अतिथी लेफ्टनंट कर्नल अद्वैत गद्रे यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन करून सैनिकी प्रशिक्षणात उपलब्ध असलेल्या नवनवीन संधी विषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. दिना गद्रे यांनी एनडी ए व सैनिकी स्कूल प्रशिक्षण विभागात विद्यार्थिनींना उपलब्ध झालेल्या नवनवीन संधीविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. स्वरा थरवळ यांनी केले. आभार सौ. सुप्रिया चव्हाण पाटील यांनी मानले. Computer Room in English Medium School

Tags: Computer Room in English Medium SchoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.