• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भूमिगत केबल खोदाई मृत्यूचा सापळा

by Mayuresh Patnakar
July 3, 2026
in Guhagar
16 0
0
Complaints about digging underground cables
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर पं. स. मासिक सभेत सभापतींकडून नाराजी

गुहागर, ता. 03 : तालुक्यात महावितरणचा भूमिगत केबलचा विषय गंभीर बनला आहे. भूमिगत केबल सर्वांच्या फायद्यासाठी आहे. मात्र सदर काम करताना केलेल्या चुकांमुळे एकप्रकारे मृत्यूचे सापळे तयार केले गेले आहेत, यावर नाराजी व्यक्त करत महावितरणने ठेकेदाराकरवी रस्त्याची साईडपट्टी तातडीने सुरळीत करावी, त्याचबरोबर जिल्हा परिषद रस्त्याच्या खोदकामाचे पैसे भरावेत, अशी सूचना महावितरण विभागाला सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती नीलेश सुर्वे यांनी केली. Complaints about digging underground cables

गुहागर पंचायत समिती सभागृहामध्ये पं. स.ची मासिक सभा सभापती प्रणव पोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेतून सर्वच सदस्यांनी भूमिगत केबलचे कामाबाबत नाराजी व्यक्त केली. मोडकाघर-अडूर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अंजनवेलमध्ये जो भराव खचला त्याठिकाणी केबलसाठी खोदाई करण्यात आली होती. आज गटाराची सर्व माती रस्त्यावर आली आहे. रस्ते खोदाईमध्ये सार्वजनिक बाधकामकडे पैसे भरलात्, मग जिल्हा परिषद रस्त्याची खोदाई करताना विचारला होतात का? जिल्हा परिषदकडे अद्याप पैसे का भरण्यात आले नाहीत, अशा अनेक प्रश्नांनी महावितरणचा विषय चांगलाच चर्चेत आला. Complaints about digging underground cables

सदर काम निकृष्ट झाल्याचा आरोप करत संबधित ठेकेदाराला तातडीने खोदाकाम केलेला भाग सुस्थितीत आणण्याच्या कडक सूचना केल्या यापाठोपाठ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खोदकाम केलेल्या रस्ता सुस्थितीत करण्याची जबाबदारी येते. मात्र निविदा काढली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले. मात्र हीच कामे ठेकेदारांना ठरवून दिली असल्याची बाब सभागृहाने समोर ठेवली पालशेत येथे मंजूर डीपी ३० मे पर्यंत बसवला जाणार होता. तो अद्याप का बसवला नाही याचा जाब विचारत तातडीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाकडून ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ योजनेची माहिती देण्यात आली.  Complaints about digging underground cables

मात्र सामाजिक विभागाच्या प्रमुखांनीच या सभेला उपस्थित रहावे, असे सांगताना येथील रोपवाटीकेमध्ये ३८५० रोपे तयार झाली आहेत तर ती आहेत कोठे, ज्या माध्यमिक शाळांना रोपांचे वितरण झाले, त्याची लागवड झाली का याकडेही सामाजिक वनिकरणाने लक्ष द्यावे, असे सूचित करण्यात आले. Complaints about digging underground cables

जलजीवन मिशन कामांमध्ये विहिरीसाठी संमतीपत्र देण्यात आले आहे. मात्र बक्षिसपत्र नसल्याने वीज जोडणी महावितरणकडून मिळत नाही. यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, अशी मागणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आली. सांख्यिकी विभागाचे विस्तार अधिकारी चिराग घाग व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या महिनाभरात ६५० घरकुलांचे हप्ते नियमित करून दिले. महिनाभरात ७५ घरकुलांचे काम पूर्णत्वास नेले असून १८६ घरकुले पूर्ण आहेत, मात्र त्याची ऑनलाईन पूर्तता करण्याची काम सुरू आहे. एकूणच घरकुलासंदर्भात सांख्यिकी विभागाने उत्कृष्ट काम केले असून सभापती पोळेकर, उपसभापती सुर्वे यांनी या विभागाला शाबसकीची थाप दिली.  Complaints about digging underground cables

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटचे सहकारी व ज्यांनी अस्पृश्यता निवारण आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी मुंबई विधिमंडळात ऐतिहासिक कामगिरी करणारे राव बहाद्दूर सीताराम केशव बोले यांचे जन्मगाव गुहागर तालुक्यातील पालशेत तर मुळ गाव आरे आहे. ज्यांनी गरीब मुलांसाठी रात्रशाळा सुरू केली आणि स्वतः शिकवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर सामाजिक चळवळीत सहभाग नोंदवत महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्यावेळी अस्पृश्यांना पाण्याचे हक्क मिळवून देण्यात बोले यांची मोठी मदत झाली, अशा व्यक्तिमत्याचे जन्मस्थळ पालशेत किंवा मूळ गाव आरे येथे स्मारक व्हावे, असा ठराव उपसभापती नीलेश सुर्वे यांनी यावेळी मांडला. Complaints about digging underground cables

Tags: Complaints about digging underground cablesGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.