सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत निःशुल्क मार्गदर्शन
रत्नागिरी, ता. 11 : कोकणातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत, गट अ ते ड प्रवर्गातील पदांवर रूजू होऊन शासकीय नोकरीचा शुभारंभ करावा. विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य दिसावे ही अभिनव संकल्पना ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीद्वारे राबविणारे सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार हे रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसंदर्भात निःशुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत. Competitive Exam Guidance for Students

जवळपास २०० हून अधिक व्याख्यांनांद्वारे त्यांच्या अमोघ वाणी व मार्गदर्शनाने प्रेरित होऊन असंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळू लागले आहेत. शनिवार, १२ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.३० वा., राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कलामंदिर सभागृह, राजापूर, दुपारी १२ वा. रा. हि. बेर्डे माध्यमिक विद्यालय, साठवली, ता. लांजा, सायंकाळी ४.३० वा. श्रीराम मंदिर, गावडे आंबेरे, डोर्लेकरवाडी, रत्नागिरी, रविवार, १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.३० वा. स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर पावस, रत्नागिरी, दुपारी 12.30 वा. कित्ते भंडारी सभागृह, रत्नागिरी, सोमवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. भाई हेगशेट्ये कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, नावडी, ता. संगमेश्वर, दुपारी ११.३० वा., भाईशा घोसाळकर हायस्कुल, कडवई, ता. संगमेश्वर, मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा., सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय, गुणदे, ता. खेड, सकाळी ११ वा., कै. पद्मश्री श्री. म. तथा अण्णासाहेब बेहरे ज्युनिअर कॉलेज, लवेल, ता. खेड या ठिकाणी सत्यवान यशवंत रेडकर मार्गदर्शन करणार आहेत. Competitive Exam Guidance for Students
तरी यात जास्तीत जास्त कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी, पालकांनी व इच्छुक व्यक्तींनी या निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रेरणादायी व्याख्याते, प्रमुख मार्गदर्शक, सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत करण्यात आले आहे. Competitive Exam Guidance for Students