राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन
रत्नागिरी, ता.22 : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरातील स्पर्धा परिक्षा केंद्राचं उद्घाटन समारंभ २४ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ दिंगंबर शिर्के यांच्या शुभहस्ते होणार आहे. असल्याची माहिती रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी दिली. Competitive Exam Center at Ratnagiri

हा कार्यक्रम रत्नागिरी उपपरिसरात संपन्न होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषत: राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. कोकणातून अधिकाअधिक अधिकारी घडावेत आणि स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी असणारं केंद्र रत्नागिरीत सुरू व्हावं, यासाठी राज्याचे तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व आताचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला होता. रत्नागिरीतील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेसाठी पुढे यावेत तसेच विद्यार्थ्याना अभ्यासासाठी परिपूर्ण असं केंद्र तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराने पुढाकार घेतला आणि अखेर हे केंद्र आता तयार झालं आहे. Competitive Exam Center at Ratnagiri

कोकणातील खास करून रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीजास्त लाभ या स्पर्धा परिक्षा केंद्राचा घ्यावा असं आवाहन रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर आणि प्रभारी कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी केलं आहे. Competitive Exam Center at Ratnagiri

