निंबरेवाडी विकास मंडळाचा स्तुत्य उपक्रम
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील वाघांबे निंबरेवाडी विकास मंडळातर्फे शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत इ. १ ली ते पदवीधर विद्यार्थ्यांच्या रंगभरण, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. प्रास्ताविकात विनायक निंबरे यांनी मंडळाचे ध्येय व स्पर्धांवर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानीगणपत निंबरे होते. Competitions under Educational Activities
यावेळी वाघांबे कुणबी संघटना मुंबईचे अध्यक्ष मोहन निंबरे, सचिव संदीप ठोंबरे, सहसचिव शांताराम ठोंबरे, चंद्रकांत निंबरे, अशोक, विनायक निंबरे, सौ. अस्मिता निंबरे, विश्वनाथ निंबरे, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कावणकर, उपसरपंच मंगेश निंबरे , तुकाराम निंबरे, कृष्णा निंबरे, सुरेश निंबरे, शंकर निंबरे, लक्ष्मी महिला मंडळ अध्यक्षा सौ. नेत्रा निंबरे, मुंबई स्थानिक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, वाघांबे गावातील पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक निंबरे यांनी केले. स्पर्धांचे परिक्षण मोहन पागडे, ज्येष्ठ शिक्षक सुरेश आंबेकर यांनी केले. Competitions under Educational Activities