• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हा ब्रिज असोसिएशनतर्फे डुप्लिकेट ब्रिज स्पर्धा

by Guhagar News
June 5, 2025
in Maharashtra, Ratnagiri
79 1
0
Competition by District Association in Ratnagiri
155
SHARES
443
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्राचार्य डॉ. सुभाष देव स्मृतीप्रीत्यर्थ आयोजन; आ. रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य

रत्नागिरी, ता. 05 : रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने शनिवारी दि. ७ आणि रविवारी दि. ८ जून रोजी दिवंगत प्राचार्य डॉ. सुभाष देव स्मृतीप्रित्यर्थ, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा साळवी स्टॉप येथील नक्षत्र हॉलमध्ये होणार आहे. Competition by District Association in Ratnagiri

या स्पर्धेचे उद्घाटन ७ जून रोजी दुपारी १२ वाजता श्रीमती सुखदा देव यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर डुप्लिकेट ब्रिजचे प्रत्येकी ८ बोर्डाच्या सहा फेऱ्या खेळवल्या जातील. यामधून चार किंवा सहा संघ गोल्डन ग्रुपसाठी पात्र होतील. दुसऱ्या दिवशी या पात्र संघात ऑल टू प्ले ऑल या पध्दतीने सामने होऊन त्यातून नंबर निश्चित केले जातील. राहिलेले संघ पुन्हा लीग मॅच खेळतील व त्यांच्यातूनही तीन नंबर काढले जातील. Competition by District Association in Ratnagiri

या स्पर्धेत मुंबई, गोवा, पुणे, बेळगाव, कोल्हापूर, राजापूर, देवगड, सावंतवाडी व यजमान रत्नागिरीमधील संघ भाग घेणार आहेत. एका संघात जास्तीत जास्त सहा खेळाडू असतात. या स्पर्धेसाठी एकूण सुमारे पन्नास हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचे संचालक म्हणून दक्षिण दास आणि राजीव देव काम पाहणार आहेत. ब्रिज हा जागतिक दर्जाचा पत्त्यांचा खेळ असून ऑलिंपिकमध्येही याचा समावेश करण्यात आला आहे. जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले आणि सचिव सचिन जोशी यांनी केले आहे. Competition by District Association in Ratnagiri

Tags: Competition by District Association in RatnagiriGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share62SendTweet39
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.