गुहागर, ता. 23 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे शनिवारी नव – मतदारांशी संवाद साधला गेला. यावेळी नव मतदारांना मतदान विषयक जनजागृती निर्माण करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नव मतदारांसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Communication with new voters

यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ. भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी अनेकांनी प्रचंड संघर्ष केला. महिलांना तर खूप मोठ्या संघर्षानंतर हा अधिकार मिळवता आला. आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्याला लोकशाही राज्य पद्धतीने प्रत्येकाला मतदानाचा हक्क दिला आहे. गाव, तालूका, जिल्हा, राज्य, देश प्रत्येक पातळीवर आपण आपल्याला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला मतदानाद्वारे निवडतो. लोकशाहीमध्ये हाच अधिकार सर्वात महत्त्वपूर्ण अधिकार आहे. जागरूक मतदार म्हणून प्रत्येकाने अचूक व्यक्तीला मतदान करणे काळाची गरज आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था व प्रगती साधण्यासाठी अचूक व्यक्तीचा शासनामध्ये समावेश होणे गरजेचे आहे. आपल्याबरोबरच आपल्या घरच्या व्यक्तींनीही शंभर टक्के मतदान करावे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे, असे आवाहन करताना विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून सर्वांना मतदानासाठी जागरूक करावे. Communication with new voters

शासनाकडून नव मतदारांसाठी मार्गदर्शनाबाबत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा पथनाट्य याविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. त्याबरोबरच एक पथनाट्याचे सादरीकरण व पोवाडा देखील सादर करण्यात आला. यासाठी शाहीर सचिन पवार यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी नोडल अधिकारी सिनियर कॉलेज पाटपन्हाळेचे डॉ. देसाई, नोडल अधिकारी श्री. तोडकरी, ज्युनिअर कॉलेज पाटपन्हाळेचे श्री. सावंत यांनी मेहनत घेतली. Communication with new voters

या कार्यक्रमाला तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी परीक्षित पाटील, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, विस्तार अधिकारी अशोक गावणकर, पाटपन्हाळे केंद्रप्रमुख श्री. एन. पी. लोहकरे, सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी सुशांत नलावडे, झोनल ऑफिसर श्री. सी. आर. बेलेकर, सीनियर कॉलेज पाटपन्हाळेचे डॉ. पारखे, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेचे मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, सर शाहीर सचिन पवार, ढोलकी साथ श्री. प्रभाकर मास्कर, हार्मोनियम श्री. महेंद्र, केंद्रप्रमुख श्री. टि. बी. निवाते, श्री. अमराळे, श्री. नंदकुमार पवार, श्री. खेराडे, श्री. गवळी, श्री. रेडेकर, श्री. खेराडे, मासु नंबर १ शाळेचे विद्यार्थी, श्री. कोरके, श्री. शरद गोरड, तलाठी श्री. शिंदे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. नमिता वैद्य यांनी केले. Communication with new voters

