विकास कामे आणि प्रश्न मार्गी लावणार; संपर्कप्रमुख शरदराव बोबले
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 05 : 264 विधानसभा संपर्क प्रमुख शरदराव बोबले यांनी दिलेल्या माहितीनुसार गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक वाडी व गावातील विकास कामे व तेथील स्थानिक प्रश्न मार्गी लागावेत यासाठी बळीराज सेनेच्या वतीने गुहागर, खेड व चिपळूण तालुक्यातील नागरिकांना संपर्क साधण्यासाठी पक्षाच्या वतीने मुंबई व स्थानिक पातळीवर संपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. Communication campaign on behalf of Baliraj Sena
यासाठी पक्षाच्या वतीने दर गुरुवार व शुक्रवार मुंबई पक्ष कार्यालयामध्ये सायंकाळी पाच ते सात या वेळेत पदाधिकारी उपलब्ध असतील पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार संपर्कप्रमुख शरदरावजी बोबले व सहसंपर्कप्रमुख संतोष निवाते यांनी विकास कामे जलद गतीने पूर्ण होण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे या संपर्क मोहिमेचा फायदा मुंबई स्थानिक नागरिकांनी तसेच वाडी वस्त्यातील पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे सादर करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Communication campaign on behalf of Baliraj Sena

याबाबत अधिक माहिती देताना संपर्कप्रमुख शरदराव बोबले यांनी सांगितले आहे की, 264 गुहागर विधानसभा मतदारसंघात गुहागर तालुका व खेड तसेच चिपळूण तालुक्यातील काही गावे समाविष्ट आहेत वर्षानुवर्षे या गावांमध्ये अनेक कामे रखडलेली आहेत. अशी प्रलंबित विकास कामे सरकारी पातळीवर तसेच प्रशासकीय पातळीवर मार्गस्थ व्हावी यासाठी बळीराज सेनेच्या वतीने संपर्क मोहीम राबवून ती पूर्ण करण्याचा मानस आहे यासाठी स्थानिक व मुंबई पातळीवरचे काही प्रमुख कार्यकर्ते काम करणार आहेत करिता संबंधित नागरिकांनी गावातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांनी पक्ष कार्यालय मुंबई मुलुंड येथील कुणबी वसतीगृह 90 फीट रोड आंबेडकर नगर गॅलेक्सी हॉटेल जवळ मुलुंड पूर्व मुंबई येथे सायंकाळी दर गुरुवारी व शुक्रवारी पाच ते सात या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. Communication campaign on behalf of Baliraj Sena