• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयात कॉमर्स फेस्ट संपन्न

by Ganesh Dhanawade
February 1, 2023
in Guhagar
122 1
0
Commerce fest concluded at Patpanhale College

विद्यार्थ्यांना गौरविताना न्यु इंग्लिश ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. एम. ए. थरकार

240
SHARES
686
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने कॉमर्स फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. सलग चार दिवस या पाच स्पर्धा घेण्यात आल्या. Commerce fest concluded at Patpanhale College

विद्यार्थ्याच्या व्यावसायिक गुणांना वाव मिळावा, त्यांच्यांत विविध कौशल्ये विकसित व्हावीत, मार्केटिंग कौशल्ये समजावीत, त्यांच्या ज्ञानात व आत्मविश्वासात वाढ व्हावी, यासाठी या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी एकुण ३० हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. तसेच प्रथम क्रमांकास तीन हजार, द्वितीय क्रमांकास दोन हजार व तृतीय क्रमांकास एक हजार रोख बक्षिस, आकर्षक चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. Commerce fest concluded at Patpanhale College

कॉमर्स फेस्ट २०२३ या दुस-या पर्वात वाणिज्य प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रश्नमंजुषामध्ये वाणिज्य शाखे संदर्भात मुलभुत प्रश्न विचारण्यात आले. एकुण १०० गुणांची ही परिक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सिनिअर व ज्युनिअर विभागातील मिळून एकुण २४० विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सिनिअर विभागात प्रथम क्रमांक कु. कोमल झिंबर, व्दितीय क्रमांक कु. विद्या विचारे तर तृतीय क्रमांक कु. वसुधा भागडे या विद्र्यार्थ्यांनी मिळविला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. संजीव मोरे यांचे उपस्थित घेण्यात आला.  Commerce fest concluded at Patpanhale College

पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये ३२ विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रणव टाणकर, कोमल झिंबर, कु. ईश्वरी संसारे या विदयार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ हा अंजनवेल महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. मंगेश गोरिवले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन डी. बी. जे. महाविद्यालयाच्या प्रा. रूचा खवणेकर यांनी केले. Commerce fest concluded at Patpanhale College

बुक रिव्हयु सादरीकरण स्पर्धेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये कु. कोमल झिंबर, कु. मृणाली देवेंकर, श्वेता शितप या विदयार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ हा न्यु इंग्लिश ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. एम. ए. थरकार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन प्रा. सौ. मनिषा जाधव यांनी केले. Commerce fest concluded at Patpanhale College

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

त्याच दिवशी फोटोग्राफी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये साहिल रांगळे, पार्थ माळी, ईश्वरी संसारे या विदर्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचा बक्षिस वितरण आबलोली महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. सिताराम व्हनमाने यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन रेहान फोटो स्टुडिओचे मालक शौकत मुजावर यांनी केले. Commerce fest concluded at Patpanhale College

मार्केटिंग स्पर्धा ही ख-या अर्थाने व्यवासायिक अनुभव देणारी होती. या स्पर्धेमध्ये एकुण २२ गटाने सहभाग घेतला. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस व ट्रॉफी टीवायबीकॉमच्या प्रणव टाणकर, हिमांशु साळवी, कल्पेश खांडेकर, सोनिया पावरकर यांनी मिळविली. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणुन प्रसिध्द उदयोजक श्री. शामकांत खातु आणि आणि लायन्स क्लब चिपळुण गॅलेक्सीच्या अध्यक्षा तेजल पेढांबकर यांनी पाहिले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाणिज्य विभागप्रमुख प्रा. एस. एस. खोत, प्रा. पी. एस. भागवत, ग्रंथपाल श्री. धनंजय गुरव आणि त्रिशला साबळे आणि प्राचार्य प्रमोद देसाई यांनी विशेष प्रयत्न केले. Commerce fest concluded at Patpanhale College

Tags: Commerce fest concluded at Patpanhale CollegeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.