नेहा जोशी, चंद्रकांत झगडे, वेदा प्रभुदेसाई यांच्यासह जिल्ह्यातील ५ जणांचा सहभाग
रत्नागिरी, ता. 08 : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त दिल्लीमध्ये आज ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर, २०२३ या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये संकल्प भवन, समालखा, पानिपत येथे सुरू होत आहे. या सोहळ्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून नेहा जोशी, चंद्रकांत झगडे, वेदा प्रभुदेसाई यांच्यासह जिल्ह्यातील ५ जणांनी सहभाग घेतला आहे. Commencement of Golden Festival of Consumer Panchayat


या तीन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (रा. स्व. संघ, नागपूर) यांच्यासह अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण भाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. महोत्सवातील विविध सत्रांमध्ये श्री. पियुष गोयल (ग्राहक कार्य, खाद्य आणि वितरण मंत्रालय, भारत सरकार), श्री. नारायण भाई शहा (अध्यक्ष,अ.भा.ग्रा. पंचायत, वडोदरा), श्री. अश्विनी कुमार चौबे (खाद्य- ग्राहक कार्य, वन तसेच जलवायू बदल, राज्यमंत्री भारत सरकार), श्री. गोपाल आर्य (पर्यावरण संरक्षण विशेषतज्ञ, सुरत), श्रीमती रुबिका लियाकत (उपाध्यक्ष, भारत-२४, नोएडा) आणि पल्लवी पिंगे (कलाकुंज, हाऊस ऑफ इंडियन डान्स, चंदिगड) यांचे उपस्थितांना मार्गदर्शन लाभणार आहे. Commencement of Golden Festival of Consumer Panchayat


यावेळी केंद्रीय कार्यकारणी सदस्य विजयराव भागवत (मंडणगड), केंद्रीय सहसचिव नेहाताई जोशी (देवरुख), कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत झगडे (गुहागर), जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर (चिपळूण), प्रांत कोषाध्यक्षा ॲड. वेदाताई प्रभुदेसाई (देवरुख), प्रांत कार्यकारणी सदस्य संतोष ओक (दापोली) आदी उपस्थित राहिले आहेत. Commencement of Golden Festival of Consumer Panchayat

