संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील कुणबी समाजाचे दैवत आणि श्रद्धास्थान, उध्दारकर्ते, लोकनेते, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचा २९ वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेच्या आबलोली येथील प्रधान कार्यालयात मान्यवरांचे उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. Commemoration of late Rambhau Bedal at Abaloli

यावेळी मान्यवरांचे हस्ते प्रतिमेचे पुजन, दिपप्रज्वलीत करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कुणबी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री.पांडूरंग पाते, पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री.तुकाराम निवाते, संपर्क प्रमुख श्री. विजय पागडे यांनी स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांच्या जीवन कार्याचा मनोगतातून आढावा घेत स्मृतींना उजाळा दिला. Commemoration of late Rambhau Bedal at Abaloli

यावेळी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री.पांडुरंग पाते, पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. तुकाराम निवाते, पतसंस्थेचे संचालक श्री.अनंत पागडे, श्री. संदिप पाष्टे, संचालक संदेश कदम, संचालिका श्रीमती वनिता डिंगणकर, कार्यलक्षी संचालक श्री.अनिल घाणेकर, माजी संचालक श्री.शिवराम आंबेकर, गुहागर बाजाराचे संचालक श्री.शंकर मोरे, तवसाळ गटाचे मुंबईचे अध्यक्ष श्री.अनंत कृष्णा पागडे,आरोग्य मित्र व तवसाळ गटाचे सरचिटणीस श्री.विजय पागडे, कुणबी युवा सरचिटणीस श्री. प्रमोद गोणबरे, श्री. मंगेश मोरे, जेष्ठ कार्यकर्ते श्री. काशिनाथ मोहिते, श्री गंगाराम निवाते, श्री. रविंद्र निवाते, पतसंस्थेचे कर्मचारी श्री.संतोष हुमणे, आदी समाज घटक उपस्थित होते. Commemoration of late Rambhau Bedal at Abaloli


