गुहागर, ता. 20 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असणाऱ्या रिगल कॉलेज (Regal College) शृंगारतळीमध्ये ‘कॉलेज ॲन्युअल डेज’ मोठ्या जल्लोषात पार पडले. यावेळी निरनिराळ्या स्पर्धांचेही आयोजन कॉलेजकडून करण्यात आले होते. College Annual Days at Regal College
दि. १६ जानेवारी रोजी ‘सारी डे-कुर्ता डे’, १७ जानेवारी रोजी ‘मल्टीपल कलर डे’, १८ जानेवारी रोजी ‘मिसमॅच डे’ व १९ जानेवारी रोजी ट्रॅडीशनल डेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन, कथाकथन, प्रश्नमंजुषा, रिगल आयडॉल स्पर्धांचे तसेच अंताक्षरी, फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. College Annual Days at Regal College


दि.१९ रोजी ‘पारंपारिक दिवस’ रिगलमध्ये फारच अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिवशी महाराष्ट्राचे विविध सण व उत्सव प्रत्येक वर्गाने दाखविले. यामध्ये शिमगोस्तव, शिवजयंती, गणपती उत्सव, नारळीपौर्णिमा, आषाढी एकादशी, मंगळागौर, कृष्ण जन्माष्टमी अशा विविध सण, उत्सवांचा समावेश होता. प्रत्येक वर्गाने खूप छान पद्धतीने विविध संस्कृतींचे दर्शन घडविले. यामध्ये प्रथम क्रमांक FYBCA च्या विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या ‘शिवजयंती’ या उत्सवाचा आला. तसेच काव्यवाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. सानिका कोलथरकर, द्वितीय क्रमांक कु. साक्षी गडदे, कथाकथन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. सानिका कोलथरकर, द्वितीय कु. गौरी घाणेकर यांना मिळाला. रिगल आयडॉल या स्पर्धेमध्ये कु. सानिका कोलथरकर हिला प्रथम क्रमांक मिळाला. रिगल किंग कु. पार्थ सुर्वे व रिगल क्वीन कु. मिसबाह तुरुक ठरली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये ‘कॉलेज ॲन्युअल डेज’ साजरे करण्यात आले. College Annual Days at Regal College


यावेळी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. College Annual Days at Regal College