गुहागर, ता. 04 : पीएम केअर फंडातून गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची पहाणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी केली. त्यावेळी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मी पाठपुरावा करतो संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांचे संपर्क क्रमांक तहसीलदारांकडे द्या. अशा सूचनाही डॉ. पाटील यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांना केल्या.


Ratnagiri District Collector Dr. B.N. Patil inspected an oxygen generation project. Which is being set up at a rural hospital in Guhagar from the PM Care Fund. Dr. Patil promised Medical Team of Rural Hospital about follow up for completion of the project.


काही तांत्रिक कारणांमुळे गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. गुहागरसोबत मंजूर झालेल्या अन्य प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केले. त्यामध्ये गुहागरच्या प्रकल्पाचाही समावेश होता. मात्र प्रकल्पच पूर्ण न झाल्याने उद्घाटन समारंभातून हा प्रकल्प वगळण्यात आला.


आज गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील गुहागरच्या दौऱ्यावर होते. तहसीलदार कार्यालयातील आढावा बैठक संपल्यावर डॉ. पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला भेट दिली. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. जतिन आणि डॉ. शशांक ढेरे यांनी सांगितले की ऑक्सिजन प्रकल्पाचे काम पूर्ण आहे. फक्त प्रकल्पात तयार होणारा ऑक्सिजन रुग्णालयात नेण्यासाठीच्या वाहिनीचे काम अपूर्ण आहे. ठेकेदार ही वाहीनी जमिनीखालून रुग्णालयात नेणार होता. मात्र सदर वाहीनी प्रकल्प इमारतीच्या छतावरुन रुग्णालयात आणण्याची सूचना आम्ही केली आहे. हे काम करण्यास ठेकेदार आलेला नाही. त्यावर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांचे क्रमांक तहसीलदारांकडे द्या. आम्ही त्याचा पाठपुरावा करु. असे आश्र्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.