गुहागर, ता. 29 : खारवी समाज विकास नागरी पतसंस्थेचे प्रधान कार्यालय, रत्नागिरी येथे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष श्री. लिओ कोलासो यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी संस्थेच्या कारभाराबाबत प्रशंसा करून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मनोमन शुभेच्छा दिल्या. Colaso’s visit to credit institution


खारवी समाज विकास नागरी पतसंस्थेने सातत्याने ‘अ’ वर्ग राखत सहकार क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. ही पतसंस्था मच्छीमारांना आर्थिक संकटात उभारी देण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभी असते. या पतसंस्थेच्या कार्यकर्त्यांची मच्छीमारांच्या प्रगतीसाठीची तळमळ प्रकर्षाने दिसुन येते. तळागाळातील मच्छीमारांचे विविध प्रश्न पतसंस्थेच्या माध्यमातुन सोडविले जातात. त्यामुळेच महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी पतसंस्थेला भेट दिली. पतसंस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. Colaso’s visit to credit institution


खारवी समाज विकास नागरी पतसंस्थेच्या भेटीच्यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष श्री. रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस श्री. किरण कोळीही होते. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष पावरी, उपाध्यक्ष श्री. सुधीर वासावे, ज्येष्ठ संचालक श्री.वासुदेव वाघे व संचालक श्री. मदन डोर्लेकर यांनी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. Colaso’s visit to credit institution