कोकणात पहिल्या टप्प्यात मतदानाची शक्यता
नवीदिल्ली, ता. 27 : लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या तारखांबाबत आयोग गेल्या काही महिन्यांपासून निवडणुक आयोग तयारी करत आहे. सर्व राज्यातील मुख्य निवडणूक आयुक्तांशी बैठका घेत आहेत. जे भाग संवेदनशील आहेत तेथे सुरक्षा व्यवस्था, सीमाभागात अधिक खबरदारी घेणे आधी मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. १३ मार्चपर्यंत सर्व राज्याचे दौरे पूर्ण होतील. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Code of conduct during 13 March
निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचे अधिकारी देशातील अनेक राज्यांना भेटी देत आहेत. सध्या निवडणूक अधिकाऱ्यांची टीम तामिळनाडूमध्ये आहे. त्यानंतर ते उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यामध्ये अधिकारी राज्यातील मुख्य निवडणूक आयुक्तांशी बैठका घेत आहेत. त्या त्या राज्यातील संवेदनशील मतदारसंघ कोणते, तेथे कोणत्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था आवश्यक आहे, सीमावर्ती भागातील समस्या, मनुष्यबळाची उपलब्धता आदी बिंदुंवर चर्चा होत आहे. हे दौरे पूर्ण झाल्यावर १३ मार्चनंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, अशी बातमी समोर येत आहे. ७ ते ८ टप्प्यात मतदान होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. Code of conduct during 13 March
निवडणूक आयोग १३ मार्चनंतर लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करू शकते. देशातील निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे पथक राज्यांच्या दौऱ्यावर आहे. तसेच कोणत्या राज्यात किती टप्प्यात आणि कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रियाचे नियोजन करता येईल, याचा आढावाही त्यांच्याकडून घेतला जात आहे. Code of conduct during 13 March
AI चा वापर होणार? या वर्षी निवडणूक आयोग आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्याचा विचार करत आहे. ज्यात सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर खोटी आणि चुकीची माहिती हटवली जाईल. यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. सोशल मीडियावरून खोटी आणि गैरसमज पसरवणारी बातमी तातडीने काढली जाईल. एखादा पक्ष किंवा उमेदवार नियमांचे भंग करत असेल तर त्याच्याकडून तातडीने कारवाई केली जाईल. अशा उमेदवारांचे सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक केले जाऊ शकते. Code of conduct during 13 March