• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर किनारपट्टीतील ११८ गावे होणार विकसित

by Ganesh Dhanawade
March 23, 2024
in Guhagar
823 9
0
Coastal villages will be developed

Coastal villages will be developed

1.6k
SHARES
4.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सिडकोकडे नियोजनाचे संपूर्ण अधिकार, पर्यटन विकासाला मिळणार चालना

गुहागर, ता. 23 : महाराष्ट्रातील बहुतांश भागांचा विकास केंद्रस्थानी ठेवणाऱ्या राज्य शासनाने कोकणच्या विकासाच्यादृष्टीने त्याचे सर्वाधिकार थेट सिडकोकडे सोपवले आहेत. त्यामुळे कोकण किनारपट्टी क्षेत्रात येणाऱ्या पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या ७२० कि. मी. किनारपट्टी भागाअंतर्गत येणाऱ्या १६३५ गावांचा विकास होणार आहे. यामध्ये गुहागर तालुक्यातील ११८ गावे असून त्यांचा कायापालट होऊन पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. Coastal villages will be developed

रत्नागिरी जिल्ह्यात समावेश असलेल्या गुहागर तालुक्यात निसर्गरम्य स्थळे, पर्वतरांगा, वन्यजीव अशा वैविध्यपूर्ण निसर्गाचे वरदान लाभले असून भौगोलिक, सांस्कृतिक आणि पुरातन देवस्थाने अशा अनेक बार्बीमुळे हा तालुका पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. सुपारी, नारळ, आंबा यांच्या बागा, बंदरे, कौलारू घरे, किल्ले यासह सुंदर सागरी किनारे, हिरवीगार पालवी, सागरी किल्ले याकडे पर्यटक सतत आकर्षित होतात. गुहागर तालुक्याचा मुळातच पर्यटनदृष्ट्या अद्यापही विकास झालेला नाही. विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला असूनही त्याप्रमाणात पर्यटन स्थळे विकसित झालेली नाहीत. हेदवी, वेळणेश्वर, पालशेत, गुहागर, अंजनवेल, वेलदूर ही गावे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासारखी आहेत. पालशेतसारखे बंदरही अद्याप परिपूर्ण नाही. एकूणच या संपूर्ण किनारपट्टीचा कायापालट होण्यासाठी शासनाकडून अद्याप अधिकारामुळे गुहागर किनारपट्टीची गावे विकसित होण्यास चालना मिळणार आहे. Coastal villages will be developed

या योजनेत गुहागर तालुक्यातील पांगारीतर्फे हवेली, विसापूर, मोहलवाडी म्हसकरवाडी, साखरीत्रिशूळ, टेटळे, कोळीवाडी चाळकेवाडी, धोपावे, नवानगर, घरटवाडीतर्फे वेलदूर, मौजे अंजनवेल, पालकोट तर्फे साखरी, त्रिशूळ डफळेवाडी, कारुळ, परचुरी खरेकोंड, वडद, परचुरी, पेरे, अंजनवेल कातळवाडी, वेलदूर, तळवली, साखरी ख. पारदळेवाडी, साखरी बी.के., खरेकोंड, खामशेत, कातकिरी, साखरी खुर्द, रानवी, मुंढर, निगुंडळ, मुंढर पालपेणे कुंभारवाडी, गुहागर वरचापाट, पालपेणे, वाकी, गिमवी, पालपेणे तळ्याचीवाडी, जानवळे, चिखली, देवघर, मांडवकरवाडी, पाटपन्हाळे कोंडवाडी, पिंपळवट, पाटपन्हाळे, गुहागर, शृंगारतळी, काळसूर कौंढर, झोंबडी, वरवेली, असगोली, वेळंब, मळण, पांगारीतर्फे वेळंब, निवोशी, पालशेत, बारभाई, पोमेंडी, पाली, जामसूत, पिंपर, कोतळूक, नागझरी, गोणवली, कुटगिरी, कोंडकारुळ, वेळणेश्वर, पाभरे, चिंद्रावळे, हेदवी, वाघांबे, उमराठ, मासू, आबलोली, खोडदे, नरवण, दोडवली, जांभारी, तवसाळ, पाचेरीआगर, कुडली, आंबेरे, पडवे, पाचेरीसडा, कोळवली आदी ११८ गावांचा समावेश आहे. Coastal villages will be developed

Tags: Coastal villages will be developedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share647SendTweet404
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.