डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समितीच्या बैठकीत आढावा
मुंबई, ता. 11 : मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वतयारीची बैठक काल कोंकण भवनातील पहिल्या मजल्यावरील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृहात कोंकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षेखाली पार पडली. CM Women’s Empowerment Campaign
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाचा उद्घाटन सोहळा माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते दिनांक १२.१.२०२४ रोजी नियोजित आहे. या कार्यक्रमाचा आढावा महसूल आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला. कोकण विभागातील 26 प्रमुख अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली असून, या समितीकरीता जिल्हाधिकारी रायगड यांना नोडल अधिकारी म्हणून शासनाने घोषीत केले आहे. या महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रमाकरीता विविध ठिकाणाहून सुमारे एक लाखांहून अधिक महिला उपस्थित राहणार आहेत. या महिलांकरीता त्यांच्या राहत्या ठिकाणापासून कार्यक्रम स्थळापर्यंतच्या सेवासुविधा, तात्पुरते शौचालयाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वाहनांसाठी पार्किंग, प्रवेशव्दार, विविध ठिकाणांहून नवीमुंबईला जोडणारे रस्ते अशा मूलभूत सेवा सुविधांसाठी आवश्यक साधन सामग्रीबाबतचा यावेळी आढावा घेत संबधित यंत्रणांना आयुक्तांनी सूचना दिल्या. इतक्या प्रचंड जनसमुदायाची गैरसोय होऊ नये, याबाबत सर्व यंत्रणांना काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर, रुग्णावाहिका, आवश्यक औषधांचा पुरवठा तैनात ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाकडून फायर ऑडिट करुन घेण्यात येत आहे. CM Women’s Empowerment Campaign


या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणाहून मोठया संख्येत उपस्थित राहणाऱ्या महिलांचा गोंधळ होऊ नये. यासाठी त्यांच्या जिल्हानिहाय ओळखपत्र तसेच कलर कोड देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. वाहनतळापासून ते मंडपापर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी समन्यवांची नेमणूक करण्यात येणार आहेत. यासाठी स्वयंसेवक व समन्वयक यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उमेद, अंगणवाडी सेविका, बचतगट यांनी येताना वृध्द, लहान मुल, आजारी व्यक्ती, गर्भवती महिलांना सोबत आणू नये अशा सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमस्थळी मंडपात येताना पर्स, मोबाईल आणि ओळखपत्र याशिवाय कोणत्याही इतर गोष्टी जवळ बाळगता येणार नाहीत. अशा सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आल्या. CM Women’s Empowerment Campaign
या बैठकीत नवीमुंबई महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयु्क्त रुबल अग्रवाल, परिवहन आयुक्त विवेक भिमणवार, जिल्हाधिकारी मुंबई शहर राजेंद्र क्षीरसागर, जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी रायगड डॉ. योगेश म्हसे, व्यवस्थापकीय संचालक महिला अर्थिक विकास महामंडळ इंदुराणी जाखड, पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख, उपआयुक्त (समान्य प्रशासन) अजित साखरे, उपआयुक्त (नियोजन) प्रमोद केंभावी, उपआयुक्त (नगरपालिका प्रशासन) रविंद्र जाधव, उपआयुक्त (विकास) गिरीष भालेराव, कोकण विभागातील पोलीस यंत्रणेतील अधिकारी तथा समिती सदस्य उपस्थित होते. CM Women’s Empowerment Campaign