मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लाडका भाऊ, जनतेचा मुख्यमंत्री ही ओळख महत्त्वाची
गुहागर, ता. 27 : भाजपचे वरिष्ठ नेतृत्त्व मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल. महाविकास आघाडीत असलेले स्पीडब्रेकर आम्ही काढुन टाकले आहेत. महायुती म्हणून जो मुख्यमंत्री होईल त्यालाही आमचा पूर्ण पाठिंबा असेल. याआधी त्यांनी मला समर्थन दिले. आता जो मुख्यमंत्री होईल तो महायुतीचा असेल. पुढील पाच वर्ष महायुती मजबुतीने राज्यकारभार करेल. उद्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठक आहे. त्यावेळी पुढचा मुख्यमंत्री कोण याबाबतचा निर्णय होईल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. CM Eknath Shinde Press
आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, आजचा विजय ही लॅण्डसाईड व्हिक्टरी आहे. यापूर्वी महाराष्ट्राने असा मोठा विजय कोणत्याच पक्षाला दिला नव्हता. त्याबद्दल जनतेला मनापासून धन्यवाद देतो. आम्ही महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केले. मी स्वत: पहाटे पर्यंत काम करायचो. दोन तीन तास झोप घेवून पुढच्या सभांना जायचो. न मोजता येण्याइतका प्रवास केला. मी कधीच स्वत:ला मुख्यमंत्री म्हणून घेतले नाही. तर कॉमन मॅन या भूमिकेत राहीलो. सामान्य कार्यकर्ता म्हणून कामकाज केले. भाऊ, बहीण, शेतकरी, रुग्ण या सर्वांसाठी, परिवारातील प्रत्येक सदस्याला काहीना काही करण्याचा प्रयत्न गेल्या अडीच वर्षात केला. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विकासाचा वेगही वाढवला. सरकार म्हणून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला आधार देण्याचे काम केले. जीव तोडून माझ्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांनी काम केले. या सर्व कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी उभे राहीले. अडीच वर्षापूर्वीचा प्रत्येक दिवस मला आठवतो त्यांनी पाठबळ दिले, योजनांना निधी दिला. इतकेच नव्हेतर अनेकवेळा ते महाराष्ट्रात आले. त्यामुळेच राज्याच्या प्रगतीचा वेग आम्ही गतिमान करु शकलो. आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. एवढ्या कमी वेळात एवढे निर्णय याआधीच्या कोणत्याही सरकारने घेतले नसतील. त्यामुळेच राज्य पहिल्या सहा महिन्यात तिसऱ्या क्रमांकावरुन प्रथम क्रमांकावर आणले. या सर्व कामांमुळेच निवडणुकीत मतांचा वर्षाव महायुतीवर झाला. लाडक्या बहीणींचा सख्खा लाडका भाऊ ही ओळख महाराष्ट्राने दिली. जनतेतला मुख्यमंत्री म्हणून ओळख झाली ही नवीन ओळख मला सर्व पदांपेक्षा मोठी आहे. CM Eknath Shinde Press
मी नाराज नाही. रडणारे नाही तर लढणारे लोक आहोत. मी समाधानी आहे. आता वाटतय की कुठेतरी घोडं अडलयं. पण असे काही नाही. नवे सरकार बनवता कोणतीही अडचण माझ्यामुळे येईल असे मानू नका. असे थेट पंतप्रधानांना फोन करुन सांगितले आहे. देशातील एनडीएचे आणि राज्यात महायुतीचे प्रमुख म्हणून मोदी, शहा यांना सांगितले की, जो निर्णय घ्यायचा तो मला मान्य असेल. मी काम करत रहाणारा कार्यकर्ता आहे. आता महायुती म्हणून आमची जबाबदारी वाढली आहे. अडीच वर्षात जे काम केले त्यापेक्षा अधिक काम करायचे आहे. CM Eknath Shinde Press
जीवन में असली उड़ान अभी बाकी है,
अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमीन,
अभी तो सारा आसमान बाकी है।