गुहागर, ता. 18 : रिगल कॉलेज शृंगारतळीच्या बीसीए विभागामार्फत रविवार दि.17 मार्च 2024 रोजी तळवली येथे एक दिवशीय स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत तळवली ते गावदेवी सुंकाई मंदिराच्या आवाराची साफसफाई केली. Cleanliness Mission by Regal College

या अभियानाची सुरुवात तळवली हायस्कूल येथील परिसरातील साफसफाई करण्यापासून झाली. यानंतर तळवली बागकर स्टॉप, ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय तसेच गावदेवी सूंकाई मंदिराच्या आवारातील साफसफाई विद्यार्थिनीमार्फत करण्यात आली. या एकदिवसीय स्वच्छता अभियानामध्ये रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या बीसीए विभागातील सर्व विद्यार्थिनी सहभागी झाल्या. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.संजयराव शिर्के, संचालिका डॉ.सुमिता शिर्के, शृंगारतळीच्या प्राचार्य सौ रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान संपन्न झाले. Cleanliness Mission by Regal College

या शिबिराला तळवली सरपंच सौ मयुरी शिगवण, सुंकाई देवस्थान अध्यक्ष श्री गणपत शिगवण, संचालक, श्री दिलीप आग्रे, सचिव श्री प्रदीप चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच अशा पद्धतीचे स्वच्छता अभियान राबवून तळवली गावाची साफसफाई केल्याबद्दल विद्यार्थिनींचे कौतुक केले. या अभियानासाठी रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे, बीसीए विभागाच्या प्रा.सौ. समीरा नरवणकर, प्रा.सौ. सोनल पाटील तसेच प्रा. श्री.मनीष पवार उपस्थित होते. Cleanliness Mission by Regal College
