गुहागर, ता.17 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमध्ये स्वच्छता पंधरवड्यामध्ये विविध स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात गुरुवार दि. १६ मे रोजी स्वच्छते विषयी शपथ घेऊन हाउसिंग कॉलनी परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. Cleanliness in Ratnagiri Gas Company
या प्रभातफेरी मध्ये कंपनीतील विविध विभागांचे अधिकारी, शालेय विद्यार्थी आणि सीआयएसएफचे जवान यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या प्रभातफेरीचा मुख्य उद्देश स्वच्छतेबाबत जनजागृती करणे हा आहे. यावेळी डी. सुरेश एजीएम मेंटेनन्स, अशोक कुमार एजीएम ओ.अँड एम., स्नेहाशिष भट्टाचार्य एजीएम एच.आर.,अमित शर्मा मॅनेजर एच.आर., सुरजित चॅटर्जी प्रिन्सिपल, बालभारती पब्लिक स्कूल व इतर अधिकारी वर्ग यांच्यासह सीआयएसएफचे जवान व बालभारती पब्लिक स्कूलचे विद्यार्थी यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. Cleanliness in Ratnagiri Gas Company