जनार्दन आंबेकर, सरपंच
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथे सोमवार दि. 0२ रोजी आंबेकरवाडी येथील अंगणवाडीत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी अंगणवाडी सेविका राधा आंबेकर, मदतनीस निलम जोशी आणि उमराठ खुर्दच्या पोलीस पाटील वासंती आंबेकर तसेच ग्रामस्थांचे सहकार्याने पार पडला. Cleanliness campaign conducted by Umrath villagers

सुरूवातीला ग्रामस्थ आणि उमराठ खुर्द आंबेकरवाडी विकास मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. गंगाराम आंबेकर यांच्या हस्ते बापूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आला. यावेळी उमराठचे पोस्ट मास्तर दिलीप आंबेकर, पोस्टमन दामोदर आंबेकर, पोलीस पाटील वासंती आंबेकर, उमराठ ग्रा. सदस्या अर्पिता गावणंग आणि अंगणवाडी सेविका राधा आंबेकर, निलम जोशी, रेश्मा आंबेकर आणि अस्मिता आंबेकर उपस्थित होते. सर्वांनी पुषांजली अर्पण करून अभिवादन केले. Cleanliness campaign conducted by Umrath villagers

त्यानंतर उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथील अंगणवाडी व जि. प. शाळा आंबेकरवाडी नं.२ परिसरातील मुख्य रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ग्रामस्थ गंगाराम आंबेकर, दिलीप आंबेकर, दामोदर आंबेकर, पोलीस पाटील वासंती आंबेकर, अंगणवाडी सेविका राधा आंबेकर, मदतनीस निलम जोशी, ग्रामपंचायत सदस्या अर्पिता गावणंग, रेश्मा आंबेकर, अस्मिता आंबेकर, देवजी दवंडे, छोटा विद्यार्थी शाम आंबेकर, वैष्णवी आंबेकर तसेच इतर विद्यार्थींनी आणि ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला होता. Cleanliness campaign conducted by Umrath villagers

