गुहागर, ता. 27 : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे गुहागर मधील शेकडो श्री सदस्यांनी शहरातील स्वच्छता मोहिमेमध्ये (Cleanliness campaign) सातत्यता राखली आहे. रविवारी गुहागर विजापूर मार्गावरील रस्ता चकाचक करण्याची मोहीम हाती घेतली होती. शहरापासून दोन किलोमीटरचा रस्ता श्री सदस्यांनी स्वच्छ केला आहे. Cleanliness campaign by shree Members

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्रामध्ये रस्ते दत्तक स्वरूपात घेऊन ते वर्षभर स्वच्छ ठेवण्याचे अभियान राबवण्यात येत आहे. तसेच गुहागर शहरातील गुहागर विजापूर या मुख्य रस्त्याची स्वच्छता मोहीम डिसेंबर पासून राबविण्यात येत आहे. शहरातील अंतर्गत रस्ते स्वच्छ केल्यानंतर शहराच्या मुख्य नाक्यापासून ते दोन किलोमीटरचा रस्ता श्री सदस्यांचे हजारो हात स्वच्छतेमध्ये राबत आहेत. गोळा केलेला कचरा नगरपंचायतीच्या कचरा गाडीमध्ये तसेच सदस्यांनी काही खाजगी वाहने उपलब्ध करून त्याद्वारा कचरा नगरपंचायतीने ठरवून दिलेल्या जागेमध्ये टाकण्यात आला. या मोहिमेत दोन टन ओला तर एक टन सुका कचरा गोळा करून नगरपंचायतीच्या कचरा प्रकल्पामध्ये टाकण्यात आला. गुहागर शहराबरोबर गुहागर तालुक्यातही स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. Cleanliness campaign by shree Members

