यंदाही बारावीत मुलींचीच बाजी; राज्याचा निकाल ९१-८८% टक्के
कोंकण विभागाची राज्यात बाजी
पुणे, ता. 05 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेचा निकाल ९१ टक्के इतका लागला असून, परीक्षेला बसलेल्या १४ लाख विद्यार्थ्यांपैकी १३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीही दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. Class 12th results announced


मुलांचा अन् मुलींचा निकालात किती आहे फरक?
मुलींची यंदा बारावीची टक्केवारी ९४.५८ टक्के इतकी आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल ५.०७ टक्क्यांनी अधिक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा कोकणचा निकाल ९६.७४ टक्के सर्वाधिक लागला आहे. तर लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. म्हणजे मुलींची उत्तीर्णची टक्केवारी ५.०७ टक्के अधिक आहे. Class 12th results announced
विभागनिहाय निकाल
पुणे-९१.३२ टक्के
कोकण- ९६.७४ टक्के
नागपूर- ९१.३२ टक्के
छत्रपती संभाजीनगर-९२.२४ टक्के
मुंबई- ९२.९३ टक्के
कोल्हापूर- ९३.६४ टक्के
अमरावती- ९१.४३ टक्के
नाशिक – ९१.३१ टक्के
लातूर – ८९.४६ टक्के