• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 July 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी महावितरण कार्यालयाला नागरिकांचा घेराव

by Mayuresh Patnakar
July 7, 2026
in Guhagar
81 1
0
Citizens surround Shringartali Mahavitaran office
160
SHARES
457
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 07 : मान्सूनपूर्व आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत न केल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, वीजवाहिन्या तुटणे, वीजखांब कोसळणे तसेच नागरिकांच्या संमतीशिवाय सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याच्या आरोपांमुळे संतप्त नागरिकांनी शृंगारतळी येथील महावितरण कार्यालयाला घेराव घालत उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. Citizens surround Shringartali Mahavitaran office

मान्सून सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटणे, वीजखांब कोसळणे आणि दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी, वीजवाहिन्यांची तपासणी, जीर्ण खांब बदलणे आणि आवश्यक देखभाल करण्यात महावितरण प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय, स्मार्ट मीटर बसविण्याबाबत नागरिकांची पुरेशी माहिती न देता तसेच संमती न घेता सक्ती केली जात असल्याचा मुद्दाही आंदोलनादरम्यान उपस्थित करण्यात आला. स्मार्ट मीटरबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करावी, नागरिकांच्या शंका दूर कराव्यात आणि सक्तीची पद्धत तात्काळ थांबवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. Citizens surround Shringartali Mahavitaran office

संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना विविध समस्यांचा पाढा वाचून दाखवत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांमुळे शेती, व्यावसायिक व्यवहार आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत लवकरात लवकर आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे तसेच वरिष्ठ स्तरावर नागरिकांच्या मागण्या पोहोचविण्याचे आश्वासन दिले. मात्र, ठोस कार्यवाही न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला. Citizens surround Shringartali Mahavitaran office

यावेळी पाटपन्हाळेचे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असिम साल्हे, ॲड. संकेत साळवी, अजित बेलवलकर, विश्र्वास बेलवलकर, यांच्यासह गुहागर तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. Citizens surround Shringartali Mahavitaran office

Tags: Citizens surround Shringartali Mahavitaran officeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.