लोटेतील घरडा केमिकल कंपनीने केली राकेश महाडीक याची निवड
रत्नागिरी, ता. 27 : चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पसमधून रसायनशास्त्र ऑरगॅनिक विभागाच्या राकेश महाडीक या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. महाडीक याला लोटे येथील घरडा केमिकल कंपनीने (Gharda Chemical Company) 3 लाखांचं पॅकेज देऊन त्याची निवड केली आहे. Choice of Mahadeek for Gharda Company

उपपरिसराच्या एमएससीच्या शेवटच्या वर्षात शिकणा-या 6 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी निवड करण्यात आली होती. या सर्व विद्यार्थ्यांच्या मुलाखती लोटे येथील घरडा केमिकल कंपनीतर्फे घेण्यात आल्या. याची व्यवस्था रत्नागिरी उपपरिसरामधील प्लेसमेंट सेल मार्फत केली होती. त्यात राकेश महाडीक या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली असून तब्बल तीन लाखांचं पॅकेज राकेशला कंपनीने दिलं आहे. Choice of Mahadeek for Gharda Company

या यशाबद्दल रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर, सहाय्यक कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी राजेश महाडीक याचे तसेच प्लेसमेंट सेल समन्वयक डाॅ विजय गुरव व सदस्य यांचे अभिनंदन केले. Choice of Mahadeek for Gharda Company