रत्नागिरी, ता. 02 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या विविध पुरस्कारांचे वितरण मंडळाच्या ९१ व्या वर्धापनदिनी थाटात करण्यात आले. मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात हा कार्यक्रम झाला. फक्त ब्राह्मण ज्ञातीपुरते मर्यादित न राहता समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. Chitpawan Brahmin Mandal Award
यावेळी (कै.) सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कार उद्योजिका वनिता उर्फ गीता परांजपे, गुहागर येथील उद्योजिका वसुधा जोग, दापोलीतील कर्णबधिर विद्यालयाच्या संचालिका सौ. रेखा बागूल यांना प्रदान केला. साडी, श्रीफळ, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याशिवाय संस्कृतप्रेमी पुरस्कार सौ. राजश्री लोटणकर यांना, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार त्रिविक्रम शेंड्ये व आर्यन भाटकर या युवकाला देण्यात आला. समशेरबहाद्दर पुरस्कार गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा (तासगाव) येथील शिवम कर्चे याला सन्मानपूर्वक प्रदान केला. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दैवज्ञ पतसंस्थेचे संस्थापक सदस्य, दैवज्ञ भवनचे अध्यक्ष विजय पेडणेकर यांना देऊन सन्मानित केले. तसेच युवा गौरव पुरस्कार अथर्व शेंड्ये याला व सेवा गौरव पुरस्कार नाचणे गावचे सदस्य सुनिल सुपल यांना प्रदान केला. Chitpawan Brahmin Mandal Award
मंडळातर्फे यंदा विशेष सत्कार करण्यात आले. यात वडिलोपार्जित व्यवसाय पुढे आधुनिक करणारे आशिष लिमये, अॅड. तेजराज जोग, नचिकेत पटवर्धन यांना सन्मानित केले. विविध परीक्षांमधील यशाबद्दल विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. सागरी सीमा मंच या संस्थेला ५ हजार रुपयांची मदत दिली. मंडळाच्या (कै.) ल. वि. केळकर वसतीगृहातील आदर्श विद्यार्थी सुजित फडके आणि (कै.) आनंदीबाई त्रिविक्रम केळकर वसतीगृहातील मधुरा घुगरे हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. (कै.) सत्यभामाबाई फडके निधीतून मेघना गोगटे यांना आर्थिक साह्य दिले. तसेच ७५ वर्षे पूर्ण झालेल्या मंडळाच्या सभासदांचा सत्कार केला. Chitpawan Brahmin Mandal Award
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष विश्वास बापट, उपाध्यक्षा स्मिता परांजपे, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, उपकार्याध्यक्ष नारायण शेवडे, कोषाध्यक्ष सौ. राधिका वैद्य, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, सहकार्यवाह अनंत आगाशे, डॉ. संतोष बेडेकर, अभय जोग, सचिन करमरकर, उदय गोडबोले, ओंकार फडके आदी मान्यवर उपस्थित होते. Chitpawan Brahmin Mandal Award