गुहागर, ता. 24 : श्री व्याडेश्वर महोत्सव निमित्त, सांस्कृतिक, कला व खाद्य असा तीन दिवसीय महोत्सव आयोजित करणेत आला होता. या निमित्त चिपळूण अर्बन बँकेच्या गुहागर शाखेच्या वतीने “ग्राहक जोडो अभियान” राबविण्यात आले. या अंतर्गत गुहागर परिसरातील व्यावसायिक, ग्राहक यांना बँक देत असलेल्या विविध सुविधा यांची माहिती देण्यात आली. Chiplun Urban’s “Customer Connect Campaign

या निमित्ताने बँकेचे ग्राहक श्री. प्रथमेश जयप्रकाश चाफेरकर, गुहागर, बाग यांनी Magnus EX EV बाईक खरेदी केली. गुहागरच्या मा.तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे. यांचे हस्ते बाईकचे वितरण करणेत आले. यावेळी व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री. शार्दूल भावे, ट्रस्टी श्री. नंदू शेठ बारटक्के, ट्रस्टी श्री.प्रथमेश दामले, पत्रकार श्री. मनोज बावधनकर बँकेचे ग्राहक श्री.अतुल साखरकर, श्री.गौरव शेठ वेल्हाळ, बँकेचे संचालक श्री. धनंजय खातू, शाखाधिकारी श्री. शैलेश देवळेकर, श्री. संतोष मावळणकर, श्री. रजनीश सकपाळ, यांचे बरोबर शाखा गुहागर, तळी, आबलोली शाखेचा सेवकवर्ग उपस्थित होता. Chiplun Urban’s “Customer Connect Campaign
बँकेने उभारलेल्या बँक काऊंटरला नगराध्यक्ष श्री. राजेश बेंडल, बँकेचे अध्यक्ष श्री. निहार गूढेकर, संचालक श्री. मोहन मिरगल, श्री. प्रशांत शिरगांवकर, श्री. मिलिंद कापडी, बँकेचे सीईओ श्री. संतोष देसाई, गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री. भरतशेठ शेटे, तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. निलेशजी मोरे, तसेच खातू मसालेचे मालक श्री. सूरज खातू व चैताली मेडिकलचे मालक श्री. अरुण शेठ ओक यांनी सदिच्छा भेट दिली. Chiplun Urban’s “Customer Connect Campaign
तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी बँकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. अनेक वर्ष चिपळूण अर्बन बँक गुहागर परिसरातील मच्छीमार, लहान मोठे व्यापारीवर्ग, रिक्षा व्यवसायिक, नोकरदार वर्ग यांना मोलाचे सहकार्य करत आहे. सेवेसाठी तत्पर असणारा सेवकवर्ग, शाखा संचालक श्री. धनंजय खातू, श्री. प्रशांत शिरगांवकर, शाखाधिकारी श्री. शैलेश देवळेकर, श्री. संतोष मावळणकर, श्री. विनायक शिगवण, अधिकारी श्री. रजनीश सकपाळ व सर्व सेवक वर्गाचे या उपक्रमाबाबत कौतुक केले. Chiplun Urban’s “Customer Connect Campaign

