• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 October 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण तालुकाही दुष्काळाच्या वाटेवर

by Mayuresh Patnakar
October 1, 2026
in Ratnagiri
16 0
0
Chiplun Taluka also received scanty rainfall
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

११ पैकी ०६ महसूल मंडळांमध्ये सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

चिपळूण, ता. 01 : कोकणात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चिपळूण तालुक्यात यंदा पावसाच्या असमान वितरणामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे. जूनमधील कमी पाऊस, जुलैमध्ये पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा निर्माण झालेली पावसाची मोठी तूट यामुळे भात व नागलीच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाच्या पीक परिस्थिती अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. Chiplun Taluka also received scanty rainfall

काही महसूल मंडळांत सप्टेंबरमधील पर्जन्यमान सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी राहिले आहे. दुसरीकडे धनगरवाड्यांसह दुर्गम वस्त्यांमध्ये यावर्षी टंचाई अधिक भेडसावणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. २६ सप्टेंबर २०२६ अखेर चिपळूण तालुक्यात ३२२८.८० मि.मी. पाऊस झाला आहे. तालुक्याची सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी ३३५०.३० मि.मी. इतकी आहे. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान ९६.३० टक्के झाले आहे. मात्र हा पाऊस संपूर्ण नसल्याने पिकांना त्याचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही. विशेषतः सप्टेंबर महिन्यातील पावसाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. सप्टेंबरची सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी सुमारे ४२९५० मि. मी. असताना प्रत्यक्षात केवळ १९९.६० मि.मी. पाऊस झाला आहे. म्हणजेच या महिन्यात सरासरीच्या तुलनेत पावसाची मोठी तूट राहिली आहे. Chiplun Taluka also received scanty rainfall

सात महसूल मंडळांत गंभीर स्थिती सप्टेंबरमध्ये तालुक्यातील अकरापैकी सहा महसूल मंडळांमध्ये सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये मार्गताम्हाने २५.८ टक्के, रामपूर ३२.५ टक्के, वहाळ ३३.१ टक्के, निवळी ३९.२ टक्के, सावर्डे ४३.५ टक्के, असुर्डे ४६.७ टक्के, कळकवणे ४२.९ टक्के या मंडळांमध्ये पावसाची मोठी तूट राहिल्याने भात व नागली पिकांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. Chiplun Taluka also received scanty rainfall

चिपळूण तालुक्यात यंदा ७५३०.२५ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाल्यास त्याचा थेट फटका तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसणार आहे. सध्या तालुक्यातील भात पीक वेगवेगळ्या अवस्थेत आहे. हळव्या भाताच्या जाती दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे उत्पादनात ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता अहवालात अवस्थेत पावसाची कमतरता राहिल्यास पोचट दाण्यांचे प्रमाण वाढण्याची व्यक्त करण्यात आली आहे. निमगरवे निर्मितीच्या भात वाण लोंबी अवस्थेत असून पावसाअभावी लोंबी निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या वाणाच्या उत्पादनात ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे तर गरवे भात वाण पोटरी अवस्थेत असून अनेक ठिकाणी या पिकाच्या अवस्थेवर पावसाच्या कमतरतेचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या वाणाच्या उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता कृषी विभागाने नमूद केली आहे. Chiplun Taluka also received scanty rainfall

Tags: Chiplun Taluka also received scanty rainfallGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.