गुहागर, ता. 20 : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळेमध्ये गाव पॅनलची सत्ता आली आहे. चिंद्रवळे, दोडवली, कर्दे व वाघांबे अशा चार गावांची ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. सलग दुसऱ्यांदा गाव पॅनेलने येथे विजयी बहुमत प्राप्त केला आहे. यामध्ये सरपंचांसह नऊ सदस्य गाव पॅनलचे निवडून आले आहेत. Chindravale Gram Panchayat Election
चिंद्रवळे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये एकूण चार गावांचे निवडणुकीसाठी तीन प्रभाग करण्यात आले होते. त्यापैकी प्रभाग क्रमांक एक मधून सौ. रमिता रामचंद्र पंडये व सौ. तेजश्री तुकाराम कांबळे या बिनविरोध निवडून आल्या. या प्रभागात सर्वसाधारण पुरुष या प्रवर्गातील एका जागेसाठी प्रत्यक्ष निवडणूक पार पडली. या निवडणुकीत गाव पॅनेलचे श्री. विवेक रामचंद्र बारस्कर भरघोस मतांनी निवडून आले. प्रभाग क्रमांक दोन मधून श्री. मंगेश विष्णू निंबरे, सौ. प्रियांका प्रवीण ठीक व सौ. शुभांगी प्रभाकर गराटे हे बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्रमांक तीन मधून श्री. संजय लक्ष्मण हुमणे, श्री. महेश गोपाळ डिंगणकर व सौ. सुगंधा संतोष वणे हे बिनविरोध निवडून आले. सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत श्रीमती मालती महादेव वणे या बिनविरोध निवडून आल्या. ही निवडणूक होण्यासाठी चारही गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचे व मतदारांचे सहकार्य मिळाले. या सर्वांचे गाव पॅनेलच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. Chindravale Gram Panchayat Election
सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन लोकाभिमुख व पारदर्शक कारभार करण्याचे अभिवचन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या वतीने देण्यात आले. शांततेने, सामंजस्याने व सलोख्याने गावातील निवडणुका पार पडल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले. Chindravale Gram Panchayat Election