• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त दिंडी

by Guhagar News
December 15, 2022
in Ratnagiri
60 0
0
Children's Dindi at Swami Swaroopanand Temple

स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त बालवारकऱ्यांच्या दिंडी

117
SHARES
335
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता.15 : पावस येथील स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त रविवारी सकाळी बालवारकऱ्यांच्या दिंडीचा सोहळा रंगला. शहरातील सहा शाळांतील विद्यार्थी यात सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा आणि वारकऱ्यांच्या भूमिकेत स्वामीनाम घेत, जप करत आणि भजने म्हणत ही दिंडी लक्ष्मीचौकातून निघून वरच्या आळातील स्वामी स्वरूपानंदांच्या अध्यात्म मंदिरात पोहोचली. Children’s Dindi at Swami Swaroopanand Temple

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

पावस येथे स्वामी स्वरूपानंद मंदिरात १५ ते २० डिसेंबर या कालावधी जन्मोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे येथे बालदिंडीचे आयोजन केले होते. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई, कार्यवाह ऋषीकेश पटवर्धन, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे विश्वस्त श्री. व सौ. हेमंत गोडबोले, विवेक भावे, आगाशे विद्यांमदिरच्या माजी मुख्याध्यापिका सौ. शीतल काळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिंडीचा प्रारंभ झाला. गोदुताई जांभेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. यामध्ये लोकमान्य टिळक विद्यालय (शाळा क्र. २), सौ. मालतीबाई जोशी विद्यांमदिर, कृ. चिं. आगाशे विद्यामंदिर, परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिर, जीजीपीएस, ल. ग. पटवर्धन विद्यामंदिर या शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले. Children’s Dindi at Swami Swaroopanand Temple

Children's Dindi at Swami Swaroopanand Temple

यावेळी सौ. शीतल काळे म्हणाल्या की, सकारात्मक ऊर्जा वाढविणारा, आनंद वृद्धिंगत करणारा, भारतीय संस्कृतीचे जतन आणि वर्धन करणारा सोहळा सुंदर साजरा झाला. अभंग गायन तर अप्रतिम होते. बालवारकरी गजर, अभंग, रिंगण, फुगड्या आणि स्वामींचा जयजयकार करण्यात मंत्रमुग्ध झाले होते. जणू प्रती पंढरपूरच. काही वारकरी निवृत्ती नाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, संत तुकाराम, विठोबा- रखुमाई झाले होते. एवढेच नाही तर प्रत्यक्ष स्वामी स्वरूपानंद बालवारकरी बनून दिंडीत अवतरले. सजवलेल्या पालख्या, ध्वज, पताका हाती घेऊन मुखाने हरी नामाचा गजर करीत सारा परिसर दुमदुमला. टाळ, मृदुंगाच्या तालात हा सोहळा रंगला. Children’s Dindi at Swami Swaroopanand Temple

Children's Dindi at Swami Swaroopanand Temple
स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त बालवारकऱ्यांच्या दिंडी
Children's Dindi at Swami Swaroopanand Temple
स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त बालवारकऱ्यांच्या दिंडी
Tags: Children's Dindi at Swami Swaroopanand TempleGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share47SendTweet29
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.