गुहागर, ता. 15 : जि. प.पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, वेलदूर नवानगर येथे १४ नोव्हेंबर रोजी ‘बालदिन’ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त भारत पेट्रोलियम कंपनी आणि राजलक्ष्मी ऑटोमोबाईल्स यांचं कडून मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. ह्या बाल दिनाचा आनंद लुटत विद्यार्थी आणि शिक्षकवृंदानी हा दिवस स्मरणीय केला. ‘Children’s Day’ celebrated at Veldur Nawanagar School

यावेळी भारत पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी श्री अरविंद सिंग म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनात बाल दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यापुढेही आपण शाळेला सर्वतोपरी सहकार्य करू. ‘Children’s Day’ celebrated at Veldur Nawanagar School
यावेळी वेलदुर ग्रामपंचायतचे सरपंच दिव्याताई वनकर, भारत पेट्रोलियम कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री अरविंद सिंग, राजलक्ष्मी ऑटोमोबाईल्स पेट्रोल पंपाचे केतन वनकर, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता जांभारकर, मारुती रोहीलकर, युवा नेते मनोज पावस्कर, मुख्याध्यापक मनोज पाटील, पदवीधर शिक्षक निलेश पाटील, शिक्षक वृंद धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील सर यांनी केले. ‘Children’s Day’ celebrated at Veldur Nawanagar School
