गुहागर, ता. 28 : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जि. प.पू. प्रा. शाळा कुटगिरी नं.१, ता.गुहागर या शाळेने ‘बालबाजाराचे’ यशस्वी आयोजन केले होते. यातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. बालबाजाराचे उदघाटन गावचे सरपंच मा. श्री.समीर डिंगणकर यांच्या हस्ते करण्यात आले. Children’s bazaar organized at Kutgiri school

यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना या बालबाजारात संधी देण्यात आली. सँडविच, भेळ, पाणीपुरी, सरबत, लाडू, भाजी, हस्तकला असे विविध प्रकारचे सात स्टॉल टाकून विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य शिकवण्याचा आदर्श वस्तुपाठ शाळेने दाखवून दिला. शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम शाळा नेहमीच राबवित असते. यावेळी झोंबडी केंद्राचे केंद्रीय प्रमुख श्री. अशोक गावणकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व स्टॉलवर खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. पालक, ग्रामस्थ, झोंबडी केंद्रातील शिक्षक यांनी बहुसंख्येने उपस्थिती दाखवून स्टॉलवर खरेदी करून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन दिले. Children’s bazaar organized at Kutgiri school

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका सौ. ऋतुजा सोहनी, उपशिक्षिका सौ.स्नेहा निर्मळ, विषयशिक्षिका सौ. शामल पवार, उपशिक्षक श्री. मारुती फटकरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष खेतले, उपसरपंच श्री. विजय कदम, स्वयंपाकी श्रीम.सुरेखा जाधव यांनी विशेष प्रयत्न केले. Children’s bazaar organized at Kutgiri school
