गुहागर, ता.12: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर यांच्यावतीने बालक पालक शिक्षक मेळावा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक १६ ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी १०.३० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत पाटपन्हाळे येथे या कार्यक्रम घेण्यात येणार आहे. Child parent teacher meet

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष अखिल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ प्रवीण काटकर यांची प्रमुख उपस्थितीत लाभणार आहे. यावेळी प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, नवोदय विद्यालय गुणवत्ताधारक, इयत्ता दहावी व बारावी विशेष प्राविण्य विद्यार्थी तसेच एकलव्य पुरस्कार विजेता विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सन्मानपत्र रोख रक्कम व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हानअध्यक्ष मनोज पाटील सरचिटणीस संजय जंगम कार्याध्यक्ष अनिल अवेरे यांनी केले आहे. Child parent teacher meet
