• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राम मंदिराच्या उभारणीने सुरु होणारे नव वर्ष उत्साहवर्धक असेल

by Manoj Bavdhankar
January 1, 2024
in Bharat
145 2
0
MPSC Candidates Thanked Chief Minister
285
SHARES
814
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

मुंबई, ता. 01: अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य अशा राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिराच्या उभारणीने नव्या वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात होत असून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्राची देखील वेगाने प्रगतीकडे वाटचाल होत राहील, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र जी मोदी यांच्या प्रेरणेतून अयोध्येत भव्य असं राम मंदिर उभारलं जात आहे. करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण होत आहे. नव्या वर्षाची ही सुरुवात निश्चितच खूप उत्साहवर्धक आहे. Chief Minister wished for New Year

आपण सगळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. आपल्याला माहिती आहे की महायुती सरकारने राज्यात दुर्बल, कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला यांना डोळ्यासमोर ठेऊन अनेक निर्णय घेतले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, एकीकडे उद्योग, पायाभूत सुविधा वाढवतांना सामाजिक न्यायाचे निर्णय घेऊन महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. महाराष्ट्राकडे  गुंतवणूकदार, उद्योगपतींचा ओढा दिवसागणिक वाढतो आहे. नुकतेच आपण परकीय गुंतवणुकीत परत एकदा देशात पहिल्या क्रमांकावर आलो आहोत. नव्या वर्षात महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या प्रकल्पांची सुरुवात होत आहे. हे प्रकल्प आयकॉनिक असणार आहेत. एमटीएचएल, कोस्टल रोड, मेट्रो, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प सुरु होतील आणि राज्याची वाटचाल वेगानं १ ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे होऊ लागेल, असा विश्वास मला वाटतो. Chief Minister wished for New Year

मुख्यमंत्री म्हणतात की, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा जागतिक दर्जाच्या करणं यासाठी देखील आपण एक मोठं व्हिजन ठेवलं आहे. ही सगळी वाटचाल एकट्याने नाही तर आपल्या सगळ्यांच्या सहभागानं आणि योगदानानं होणार आहे. विकासासाठी आपण नव्या संकल्पना सुचवा, आपले विचार नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरतील. Chief Minister wished for New Year

Tags: Chief Minister wished for New YearGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet71
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.