• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

by Manoj Bavdhankar
December 18, 2023
in Bharat
134 1
1
Chief Minister Shinde's initiative saved lives
263
SHARES
752
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नागपूर, ता. 18 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या व्यक्तीसह  अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले. Chief Minister Shinde’s initiative saved lives

मुंबईहून नागपुरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलर अर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपुरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचे त्यांना समजले. याठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईकचालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याचवेळी त्या ट्रकला एक वेगन आर कारही येऊन धडकली. त्यातही गाडीतले काही जण जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली, ही परिस्थिती पाहून  मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर ते स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रकखालून बाहेर काढायला लावले. त्याचा पाय गंभीर जखमी असल्याने तत्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्याला नागपुरातील रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले. Chief Minister Shinde’s initiative saved lives

या तरुणाचे नाव गिरीश केशरावजी तिडके असे असून तो नागपूरच्या गोंड खैरीवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम (सिद्धार्थ नगरवाडी, नागपूर), रंजना शिशुपाल रामटेके (राहणार रामबाग मेडिकल चौक नागपूर) आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे (राहणार मौदा नागपूर) यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले आहेत. Chief Minister Shinde’s initiative saved lives

या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालक बनून या जखमी रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुरक्षीत असून त्यांची प्रकृती आता स्थीर आहे. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटूंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत. Chief Minister Shinde’s initiative saved lives

Tags: Chief Minister Shinde's initiative saved livesGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share105SendTweet66
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.