• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुख्यमंत्र्यांनी गुहागरवासीयांच्या भावनांचा आदर केला

by Mayuresh Patnakar
March 15, 2023
in Guhagar
167 2
0
Chief Minister respected the feelings

गुहागर : विकास आराखड्याबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित गुहागर नागरिक मंचच्या समितीचे सदस्य

328
SHARES
937
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अमरदिप परचुरे, अल्पावधीत मिळालेले हे यश आनंद देणारे

गुहागर, ता. 15 : विकास आराखड्याबाबत गुहागरवासीयांच्या भावना पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोचविल्या. मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या भावनांचा आदर करत तत्क्षणी शहरवासीयांचे निवेदनावर शेरा मारत नगरविकास खात्यांचे सचिव भुषण गगराणी यांचेकडे कार्यवाहीसाठी पाठवले. आता नगरविकास खात्याकडून पत्र आले की विकास आराखडा रद्द का की स्थगिती मिळाली. हे समजेल. मात्र अवघ्या 13 दिवसांत आपण अनुकुल निर्णयापर्यंत पोचलो आहोत. अशी माहिती गुहागर नागरिक मंचचे अमरदिप परचुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. Chief Minister respected the feelings

गुहागर शहराच्या विकास आराखड्यावर जनतेच्या मागण्याचा विचार केल्याशिवाय कार्यवाही होणार नाही असे सध्याचे चित्र आहे.  या टप्प्यापर्यंत कसे पोचलो याची माहिती गुहागर शहरवासीयांना व्हावी म्हणून नागरिक मंचातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमरदिप परचुरे म्हणाले की, शहर विकास आराखडा प्रसिध्द झाल्यानंतर त्यांचा अभ्यास करुन दोन मार्चला दिपक कनगुटकर, अमरदिप परचुरे, ओंकार गद्रे, अद्वैत जोशी, प्रथमेश दामले यांनी रत्नागिरी येथे मा. जिल्हाधिकारी, आणि नगररचनाकार रत्नागिरी यांना भेटून निवेदन दिले.  तीन मार्चला लोकांच्या सोयीकरीता सोप्या भाषेतील हरकतींचे वेगवेगळे अर्ज तयार केले आणि नागरिकांपर्यंत पोचवले. 9 मार्चला गुहागर नागरिक मंच म्हणून शहरवासीयांची बोलावली. या सभेत नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करुन नागरिकांच्या सह्या असलेले एक निवेदन तयार केले. याच सभेत गुहागर शहराच्या सर्व भागातील सदस्यांना घेवून एक समिती तयार केली. Chief Minister respected the feelings

या समितीने 13 मार्चला मुंबईत पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेवून गुहागर शहरवासीयांच्या सह्या असलेले निवेदन दिले. त्याच दिवशी तत्काळ उदय सामंत यांनी आपले पत्र जोडून गुहागरवासीयांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले आणि गुहागरातील शहर विकास आराखड्याबाबतच्या जनभावना मुख्यमंत्र्यांपर्यत पोचवल्या.  मुख्यमंत्र्यांनी देखील तातडीने या पत्रावर शेरा मारुन गुहागरवासीयांचे निवेदन नगरविकास खात्याचे मुख्य सचिन भुषण गगराणी यांना त्वरीत कार्यवाही करण्यास सांगितले. आता नगरविकास खात्याचे पत्र आल्यावर शहर विकास आराखडा रद्द झाला की त्याला तात्पुरती स्थगिती मिळाली हे स्पष्ट होईल. मात्र आहे हा आराखड्याला मंजुरी मिळणार नाही हे नक्की झाले आहे. अत्यंत कमी कालावधीत मिळालेले हे यश नक्कीच आनंद देणारे आहे. Chief Minister respected the feelings

या पत्रकार परिषदेत दिपक कनगुटकर, अद्वैत जोशी, राज विखारे, मयुरेश कचरेकर यांनी देखील विकास आराखड्यातील त्रुटी सांगितल्या. यावेळी गुहागर नागरिक मंचचे सदस्य उपस्थित होते. Chief Minister respected the feelings

Tags: Chief Minister respected the feelingsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share131SendTweet82
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.