मुख्यमंत्री शिंदे, निरामय रुग्णालयाला 10 कोटी देणार
गुहागर, ता. 16 : गुहागरमधील निरामय रुग्णालय सुरु करण्यासाठी लागणारे 10 कोटी रुपये आम्ही मंजुर करुन देऊ. कोकण विकास प्राधिकरण निर्माण करतोय. त्यातुन जलसिंचन, आंबा काजु प्रकिया उद्योग, पर्यटन उद्योग, रस्ते विकास यासाठी या प्राधिकरणाला अडीच हजार कोटी आम्ही देणार आहोत. त्यातून कोकणचा बॅकलॉग भरुन निघेल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. Chief Minister in Sringaratali to campaign for Bendal


गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा आज शृंगारतळीला झाली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, आम्ही सत्तेत आल्यावर लोकांना कल्याणकारी योजना दिल्या. 5 लाख कोटीचे उद्योग महाराष्ट्रात आणले. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र गुंतवणूकीत तिसऱ्या क्रमांकावर होता. जनतेचे सरकार आल्यावर जीडीपी, स्टार्टअप, उद्योग, पायाभुत सुविधा अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आला. परकीय गुंतवणूकीतील 52 टक्के गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात आणली. गुहागर विधानसभा मतदारसंघात कोकाकोला आणण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. मात्र मविआ सरकाऱमधील नेत्यांच्या मागण्यांमुळे हा प्रकल्प सुरु होत नव्हता. आम्ही कोकाकोलाचा मार्ग सुकर केला. त्यांनी आता कोकणात 10 पट अधिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना आणली. त्या योजनेला मविआने विरोध केला. ते आचारसंहितेचा बाऊ करतील म्हणून ऑक्टोबर महिन्यात आणखी दोन हप्ते आम्ही लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा केले. 20 तारखेला मतदान झाल्यावर डिसेंबरचा हप्ताही तुमच्या खात्यात जमा होईल. हे हप्ते घेणारे सरकार नाही. बहिणींच्या खात्यात पैसे भरणारे हे सरकार आहे. Chief Minister in Sringaratali to campaign for Bendal


आम्ही सत्तेत आलो तर लाडक्या बहीणींना 2100 रु. देणार. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार. किसान सन्मान योजनेतही राज्याचा हप्तात आणखी 3 हजाराने वाढ करणार. जीवनावश्यक वस्तुंचे भाव पुढील पाच वर्षात स्थीर ठेवणार. 25 लाख रोजगार तयार करणार. 10 लाख तरुणांना दरमहा 10 हजार प्रशिक्षणभत्ता देणार. साडेसात एचपी पर्यंतच्या कृषी पंपाचे बील माफ करणार. घरगुती बीलात 30% कपात करणार. पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती करणार. जो नराधम आमच्या लाडक्या बहीणीवर अन्याय, अत्याचार करेल त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल. हे आमचे वचन आहे. Chief Minister in Sringaratali to campaign for Bendal


मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्रातील मायभगिनी शेतकऱ्यांना, जनतेला काय मिळाले याची चिंता करणार एकनाथ शिंदे आहे. कारण हा शिंदे शेतकऱ्यांचा मुलगा आहे. सोन्याचा चमचा घेवून आलेल्यांना, पैशांच्या गादीवर लोणाऱ्यांना तुमच्या 3 हजार रुपयांची किंमत काय कळणार. जे काही करायचे तुमच्या जीवनात बदल घडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. या सभेला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांसह बळीराज सेना, कुणबी समाजोन्नती संघ या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह सुमारे 4 हजार ग्रामस्थ उपस्थित होते. Chief Minister in Sringaratali to campaign for Bendal

