संस्थेने केला ग्रामस्थांचा गौरव ; छोटेखानी समारंभाचे आयोजन
गुहागर, ता. 23 : लोकल कमिटी वेळंब या नावाखाली ५० वर्षापूर्वी सुरु केलेले हे रेशन दुकान आजवर लोकांचे सहकार्य व प्रेम यावर सुरु आहे. आमचे ओक कुटुंबीय या दोन गावांच्या सेवेत असेच निरंतर सुरु राहिल, असा विश्वास वेळंब येथील लोकल कमिटी संचलीत रेशन दुकानाचे सर्वसर्वा व वेळंबचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृण ओक यांनी व्यक्त केला आहे. Chhotekhani ceremony at Welamb


या सरकार मान्य रास्त दराच्या धान्य दुकानास ५० वर्ष पूर्ण झाल्या बद्दल चालकांतर्फे भारताच्या स्वातंच्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एक छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यांत आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बाळकृष्ण ओक होते. यावेळी प्रास्ताविक माजी सरपंच मारुती जाधव यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी ५० वर्षांपूर्वी गावात सुरु झालेल्या या दुकानाबद्दल सविस्तर माहिती सांगितली. या गावचे त्या काळातले मोठे व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते दतात्रय रामचंद्र ओक यांनी केले. आपल्या किराणा माला बरोबरच हे दुकान कसे सुरु केले व त्याला तत्कालीन सरपंच व सोसायटीचे चेअरमन कै. विष्णूपंत गाडगीळ, कै. केशव जोगळेकर यांनी व गावातील ग्रामस्थांनी कशी साथ दिली याचे सविस्तर विवेचन केले. ५० वर्षात एकही तक्रार नसलेले हे एकमेव धान्य दुकान असून कै दत्तात्रय ओक यांची दुसरी पिढी हे दुकान समर्थपणे सांभाळत असल्याचे स्पष्ट केले. Chhotekhani ceremony at Welamb


प्रारंभी लोकल कमिटी वेळंबचे चेअरमन संजय पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या दुकानावर लेखनिक म्हणून काम केलेले सखाराम मोरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कृष्णा रहाटे चंदू रहाटे व इतर काही जणांनी काम केल्याचाही उल्लेख करून त्यांचा सत्कार करण्यात आला. Chhotekhani ceremony at Welamb
वेळंबचे माजी सरपंच वसंत पिंपळे, पांगारीच्या माजी सरपंच सौ. स्वप्नाली खांबे, परशुराम निर्मळ यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी डॉ. देवस्थळी यांनीही आपले विचार मांडले. Chhotekhani ceremony at Welamb