गुहागर, ता. 22 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयामध्ये मुख्याध्यापक श्री. एम.ए. थरकार यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख वक्ते प्रा. संजीव मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in Patpanhale School
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/02/add-4-1.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/02/add-4-1.jpg)
यावेळी अकरावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी साक्षी विजय पवार हिने केलेले भाषण व शाहिरी गायनाने सादर केलेला पोवाडा विशेष लक्षवेधी ठरल्यामुळे विद्यालयातर्फे साक्षी पवारचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाध्यक्ष यांनी रोख बक्षिस व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पाटपन्हाळे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिक व नामवंत कवी राजा बढे यांनी लिहिलेले ” जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ” हे राज्यगीत गायनाने सादर करून श्री शिवरायांना मानाचा मुजरा दिला. विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री.एस.एम. आंबेकर यांनी सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन परिचय व त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी केलेले महान कार्य आदी विषयांबाबत भाषणाद्वारे मनोगते व्यक्त केली. Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in Patpanhale School
महाविद्यालयाचे प्राध्यापक संजीव मोरे यांनी शिवाजी महाराजांचा जीवन परिचय करून देऊन शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची केलेली स्थापना, महाराजांनी केलेली किल्ले बांधणी व जिंकलेले किल्ले, रोजगार निर्मिती, व्यापाऱ्यांसाठी केलेले सहकार्य, महाराजांची असणारी शिस्त, बाळगलेले ध्येयवाद, सत्तेसाठी केलेला अर्थशास्त्र व वाणिज्याचा वापर, शिवाजी महाराजांनी सामना केलेले प्रसंग, मावळ्यांचा पराक्रम, शिवाजी महाराजांजवळ असलेली मैत्रीची भावना, शत्रूंचा केलेला सन्मान आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन केले. Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in Patpanhale School
मुख्याध्यापक एम. ए थरकार यांनी जयंती साजरी करण्याचा उद्देश, जयंतीनिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेली भाषणे व साक्षी पवारने सादर केलेला शाहीरी पोवाडा याबद्दल अभिनंदन केले. गढी (वसाहत ) म्हणजे काय ते सांगून सावित्री देसाई नामक स्त्रीने केलेल्या पराक्रमाबद्दल शिवाजी महाराजांनी केलेला सन्मान व बहीण भावाचे जोडलेले नाते या प्रसंगाची माहिती, शिवाजी महाराजांनी समाजासाठी आपुलकीने व समाज हितासाठी केलेले कार्य, शिवाजी महाराजांचा जगातील अभ्यासक अभ्यास करीत आहेत इतके महान ठरलेले छत्रपती राजे, “छत्रपती शिवाजी महाराज की जय ” ही आरोळी पुकारल्यानंतर उत्साहाची व अभिमानाची निर्माण होणारी ऊर्जा आदी मुद्द्यांबाबत मार्गदर्शन केले. Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in Patpanhale School
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एम.ए. थरकार, प्रा. संजीव मोरे, माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. एस. एस.चव्हाण, उच्च माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. एम.एस.जाधव, सहाय्यक शिक्षक श्री.एस.वाय. भिडे, श्री. एस.एस. घाणेकर, श्री.एस. एम. आंबेकर, प्रा.सौ. मोरे यांच्यासह बहुसंख्य प्राध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in Patpanhale School