• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरची बुद्धिबळपटू पद्मश्री वैद्य

by Ganesh Dhanawade
March 8, 2023
in Guhagar
151 2
0
Chess player Padmashri Vaidya of Guhagar
298
SHARES
850
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 08 : गुहागर हे क्रिकेट, कबड्डी खेळासाठी प्रसिद्ध आहे. या खेळांचे चाहते सुद्धा असंख्य आहेत. बुद्धीला चालना देणारा खेळ म्हणजेच बुद्धिबळ! या खेळात बालपणा पासूनच अधिराज्य गाजविणाचा प्रयत्न गुहागर तालुक्यातील आबलोली येथील इयत्ता सहावीत शिकणारी पद्मश्री प्रसन्ना वैद्य करत आहे. जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत ती यशाला गवसणी घालत आहे. भविष्यात गुहागरची उगवती बुद्धिबळपटू म्हणून नावारूपास येईल, यात शंकाच नाही. Chess player Padmashri Vaidya of Guhagar

Chess player Padmashri Vaidya of Guhagar

कु. पद्मश्री प्रसन्ना वैद्य लहानपणी तिच्या नानांसोबत म्हणजे आईच्या वडिलांसोबत (स्व. नामदेव वामन बलंग) सतत बुद्धिबळ खेळत असे. त्यांच्या या प्रयत्नातून तिच्यामध्ये बुद्धिबळाचे बाळकडू रुजले. त्याबरोबरच तिची आई सौ. नमिता व मामा श्री. निनाद यांच्याकडूनहि तिला लहानपणी बुद्धिबळाचे धडे मिळाले. वयाच्या सातव्या ते आठव्या वर्षीपासून ती उत्तम बुद्धिबळ खेळू लागली. यानंतर तिला रत्नागिरीचे चैतन्य भिडे यांच्याकडून आठवड्यातून दोनदा प्रशिक्षण व दोन दिवस खेळ असे मार्गदर्शन मिळू लागले. त्यामुळे तिची या खेळात विविध स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थाने यशाची सुरुवात झाली. सध्या ती भिडे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. विविध शालेयस्तरीय स्पर्धा व अकॅडमीच्या स्पर्धा खेळली आहे. त्यासाठी तीचे वडील श्री. प्रसन्ना वैद्य खूप मेहनत घेतात. विविध स्पर्धांना तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. विश्वनाथन आनंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बुद्धिबळामध्ये खेळायचे आहे. असे ती अनेकदा सांगते. Chess player Padmashri Vaidya of Guhagar

Chess player Padmashri Vaidya of Guhagar

उत्तम बुद्धिबळपटू होण्याचे स्वप्न तिच्या मनामध्ये आहे. पद्मश्रीला वक्तृत्व स्पर्धेची आवड असून अभ्यासातही ती चांगले गुण मिळवते. तिने विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे मिळवली आहेत. ती उत्तम रांगोळी काढते. त्याबरोबरच तिला मेहंदी काढण्याची देखील आवड आहे. चित्रकलेची सुद्धा तिला खूप आवड आहे. ती माध्यमिक विद्यालय आबलोली येथे शिकत आहे. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धत जूलै २०२२ ला १५ वर्षांखालील मुलींच्या गटात पद्मश्री प्रसन्न वैद्य हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर खुल्या गटामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तिची जिल्हा निवड चाचणी स्पर्धेमधून राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली. पद्मश्री हिला प्रशिक्षक चैतन्य भिडे व विवेक सोहनी यांचे मार्गदर्शन लाभले. Chess player Padmashri Vaidya of Guhagar

पद्मश्री वैद्य हिने आतापर्यंत श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणच्या वतीने २०१९ मध्ये झालेल्या जिल्हास्तरावर उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. त्यानंतर बुद्धिबळ स्पर्धा २०२०- २०२१ मध्ये रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने घेतल्या गेल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये सुध्दा पद्मश्री मुलींच्या गटामध्ये प्रथम आली होती. २०२२ मध्ये आर. बी. सप्रे मेमोरिअल ऑनलाईन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शालेय स्तर बुद्धिबळ स्पर्धा विभागाला सन २०२२ – २०२३ पद्मश्री वैद्य ला १४ वर्षीय वयोगटामध्ये ६ वा क्रमांक प्राप्त झाला. Chess player Padmashri Vaidya of Guhagar

Tags: Chess player Padmashri Vaidya of GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share119SendTweet75
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.