• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 October 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

by Mayuresh Patnakar
October 2, 2026
in Guhagar
28 0
0
Chess competition in Guhagar
55
SHARES
156
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शुभम कोठारकर पुन्हा अजिंक्य; ३६ खेळाडूंचा सहभाग

गुहागर, ता. 02 : जाकादेवी सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळ, आरे यांच्या वतीने गुहागरमध्ये प्रथमच तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. श्री. भोसले कुटुंबीयांच्या २१ दिवसीय गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा पार पडली. तालुक्यातील खेळाडूंसह मुंबई, पुणे व रत्नागिरी येथील खेळाडू आणि नवोदितांनीही स्पर्धेत सहभाग घेतला. Chess competition in Guhagar

मुंबईतील ‘पप्पी दे पारोला’ फेम सुप्रसिद्ध संगीतकार मधु रेडकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. एकूण ३६ खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत गोपालकृष्ण विद्यालय व अन्नपूर्णा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. Chess competition in Guhagar

पहिल्या गटात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेचे ACM (Arena Candidate Master) टायटल मिळवलेला गोपालकृष्ण विद्यालयातील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी शुभम राजन कोठारकर याने सातही फेऱ्या जिंकत पुन्हा अजिंक्यपद पटकावले. अन्नपूर्णा विद्यालयाचा रुद्र बागकर चार गुणांसह द्वितीय, तर गोपालकृष्ण विद्यालयाचा युग देवकर साडेतीन गुणांसह तृतीय ठरला. Chess competition in Guhagar

दुसऱ्या गटात गोपालकृष्ण विद्यालयाचा शौर्य देवकर पाच गुणांसह प्रथम, ऋग्वेद खरे द्वितीय, तर परीक्षित रविंद्र बागकर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. स्पर्धेत शिवम वारेकर, सिद्धांत दिगंबर बागकर, अन्वित दिघे, परीदि देवकर, तन्वी घाणेकर, ऋत्वी बागकर यांच्यासह तालुक्याबाहेरील खेळाडूंनीही सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अनेक खेळाडूंसाठी ही पहिलीच बुद्धिबळ स्पर्धा होती. Chess competition in Guhagar

गुहागरमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करून नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल जाकादेवी सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष पराग भोसले व कार्यवाह श्रवण भोसले तसेच आरे गावातील भोसले कुटुंबीयांचे कौतुक होत आहे. Chess competition in Guhagar

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभागी होऊन ACM टायटल मिळविणाऱ्या शुभम राजन कोठारकर याने आपल्या अनुभवाचा फायदा गुहागरमधील विद्यार्थ्यांना मिळावा, या उद्देशाने यावर्षीपासून ‘शुभंराजन चेस अकॅडमी, गुहागर’ सुरू केली आहे. बुद्धिबळ शिकण्याची तसेच शालेय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी नियमित मार्गदर्शनासाठी संपर्क साधावा, असे आवाहन त्याने केले. Chess competition in Guhagar

भविष्यात जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच रेटेड बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्याचा मनोदयही आयोजकांनी व्यक्त केला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कोकण विकास महामंडळाचे अजयभाऊ खाड्ये, आरे-वाकी-पिंपळवट सरपंच समित घाणेकर, मंडळाचे अध्यक्ष पराग भोसले, कार्यवाह श्रवण भोसले, सुप्रसिद्ध पुरोहित शशी महाजन, तसेच संतोष व दीपक भोसले यांच्या हस्ते पार पडला. Chess competition in Guhagar

Tags: Chess competition in GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share22SendTweet14
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.