रत्नागिरी धन्वन्तरी रुग्णालय येथे 12 फेब्रुवारी रोजी १० ते १२ या वेळेत
गुहागर, ता. 07 : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून 12 फेब्रुवारी रोजी वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची तपासणी करणार आहेत. Checkup Camp at Test Tube Baby Centre

रत्नागिरी शहरातील शिवाजी नगर येथील धन्वन्तरी रुग्णालय येथे रत्नागिरी टेस्ट ट्युब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटरच्या माधयमातून डॉ. तोरल शिंदे रविवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत मोफत तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरांमध्ये टेस्ट ट्यूब बेबी उपचाराची आवश्यकता असल्यास रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये उपलब्ध पर्यायांची माहिती दिली जाते. तसेच पीसीओडी संदर्भातील समस्या, गर्भनलिका तपासणे, स्त्रीबीज तयार न होणे व न फुटणे, गर्भाशयाच्या गाठी व गर्भाशय काढणे, वारंवार आययूआय, टेस्ट ट्यूब बेबी यशस्वी न होणे, गर्भ रुजू न होणे, वारंवार होणारे गर्भपात, पाळीच्या तक्रारी, स्त्रियांचे वजन आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या, पुरुषांमध्ये असलेली शुक्राणूंची संख्या व हालचाली कमी असणे, तसेच सर्व प्रकारच्या लैंगिक समस्यांवर डॉ. तोरल शिंदे या शिबिरामध्ये मोफत मार्गदर्शन करणार आहेत. Checkup Camp at Test Tube Baby Centre
हे शिबीर 12 फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत धन्वन्तरी रुग्णालयात होणार असून या शिबिराचा निपुत्रीक जोडप्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धन्वंतरी रूग्णलयातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरीत 02352-221282, 02352- 355059, 9527044901 या क्रमांकावर संपर्क साधावा. Checkup Camp at Test Tube Baby Centre

