• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये मोफत तपासणी शिबीर

by Guhagar News
August 2, 2023
in Ratnagiri
43 0
0
Checkup Camp at Ratnagiri Test Tube Baby Centre
84
SHARES
241
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. 6 ऑगस्ट रोजी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची करणार तपासणी

रत्नागिरी, ता. 02 : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर मार्फत वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. हे शिबीर रविवार दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत धन्वन्तरी रुग्णालयात होणार असून या शिबिराचा निपुत्रीक जोडप्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धन्वंतरी रूग्णलयातर्फे करण्यात आले आहे. यासाठी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची तपासणी करणार आहेत. Checkup Camp at Ratnagiri Test Tube Baby Centre

रत्नागिरी शहरातील शिवाजी नगर येथील धन्वन्तरी रुग्णालयातील सन 2014 मध्ये सुरु झालेल्या कोकणातील पहिल्या अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट ट्युब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरमध्ये डॉ. तोरल शिंदे या दर महिन्याला मोफत तपासणी शिबीर घेत असतात. या शिबिरामध्ये माता आणि पिता होण्यासाठी इच्छुक जोडप्याना टेस्ट ट्यूब बेबी उपचाराची आवश्यकता असल्यास रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये उपलब्ध पर्यायांची माहिती दिली जाते. Checkup Camp at Ratnagiri Test Tube Baby Centre

त्याशिवाय पीसीओडी संदर्भातील समस्या, गर्भनलिका तपासणे, स्त्रीबीज तयार न होणे व न फुटणे, गर्भाशयाच्या गाठी व गर्भाशय काढणे, वारंवार आययूआय, टेस्ट ट्यूब बेबी यशस्वी न होणे, गर्भ रुजू न होणे, वारंवार होणारे गर्भपात, पाळीच्या तक्रारी, स्त्रियांचे वजन आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या, पुरुषांमध्ये असलेली शुक्राणूंची संख्या व हालचाली कमी असणे, तसेच सर्व प्रकारच्या लैंगिक समस्यांवर डॉ. तोरल शिंदे या शिबिरामध्ये मोफत मार्गदर्शन करतात. अधिक माहितीसाठी रत्नागिरीत 02352-221282, 02352- 355059, 9527044901 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Checkup Camp at Ratnagiri Test Tube Baby Centre

Tags: Checkup Camp at Ratnagiri Test Tube Baby CentreGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share34SendTweet21
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.