गुहागर हायस्कूल मधील स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी
गुहागर, ता. 01 : गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, स.सु.पाटील शास्त्र, म.ज.भोसले वाणिज्य, विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुंबई येथील उल्हास ट्रस्ट यांच्या वतीने धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. Check distribution to students by Ulhas Trust

मुंबई येथील उल्हास ट्रस्टतर्फे दरवर्षी उत्तम यश संपादन करणार्यां इयत्ता नववी व दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना रुपये 1000 चा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात उल्हास ट्रस्टचे कार्यकर्ते प्रफुल्ल चव्हाण, एस. बोराडे, अनुज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन याविषयी कार्यशाळा घेतली. Check distribution to students by Ulhas Trust

स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये श्यामसुंदर तुकाराम गुट्टे, चारुता मंदार आठवले, प्रेरणा दत्तात्रेय मिटकरी, कार्तिक हर्षल माळी, हेमाक्षी सुधीर भागडे, ओम दीपक देवकर, अनघा अभय साटले, समर्था मंदार मोरे, सनिष्का बळवंत रोहिलकर, आर्या राजेश तुळसकर हे दहा विद्यार्थी स्कॉलरशिप चे मानकरी ठरले. ह्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन गुहागर एज्युकेशन सोसायटीचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष दिपक कनगुटकर यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन राधा शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक सुजाता कांबळे व पर्यवेक्षक मधुकर गंगावणे उपस्थित होते. Check distribution to students by Ulhas Trust
