गुहागर, ता. 07 : जि. प. पूर्ण प्रा. आदर्श शाळा वेलदूर नवानगर मध्ये निपूण महाराष्ट्र अभियानांतर्गत चावडी वाचन करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्राथमिक स्तरावर 2026 -27 पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. इयत्ता पाचवीच्या वर्गातील किमान 75 टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियानांतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आलेले आहे. Chavdi reading at Veldur Nawanagar School


त्यानुसार इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांचे चावडी वाचन शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक सभा घेऊन करण्यात आले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी 75 % पेक्षा जास्त अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या आहेत. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. पाचवीतील विद्यार्थ्यांनी वाचनामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. Chavdi reading at Veldur Nawanagar School
या चावडी वाचनामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर, सामाजिक कार्यकर्ते सुदाम कोळथरकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या कार्तिकी दाभोळकर, देवयानी कोळथरकर, विशाखा नाटेकर, सुप्रिया कोळथळकर , व ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्री मनोज पाटील, उपशिक्षिका अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड व पदवीधर शिक्षिका अफसाना मुल्ला उपस्थित होते. मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा गायकवाड तर आभार प्रदर्शन अंजली मुद्दमवार यांनी केले. Chavdi reading at Veldur Nawanagar School