रत्नागिरी जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य गाव कामगार पो. पाटील संघाच्या सदस्यपदी
गुहागर, ता. 4 : तालुक्यातील पाटपन्हाळे गावचे सत्यप्रकाश चव्हाण हे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील आहेत. यांची महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या राज्य सदस्यपदी रत्नागिरी जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे. त्यांना नुकतेच संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ अध्यक्ष बाळासाहेब शिंदे – पाटील व राज्यसचिव कमलाकर मांगले यांच्या सहीचे सनदपत्र प्रदान करण्यात आले. Chavan’s election as state member

पाटपन्हाळे गावचे पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण हे सन १९९२ पासून कार्यरत आहेत. त्यांनी गुहागर तालुक्याचे अध्यक्ष पद दहा वर्ष भूषवले होते. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पोलीस पाटील संघाचे खजिनदार म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केले आहे. सत्यप्रकाश चव्हाण हे पदावर असताना सर्व पोलीस पाटील यांच्या सहकार्याने सन्मानपूर्वक कामगिरी केली आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे रत्नागिरी जिल्हा पूर्वीच्या संघटनेला व आताच्या संघाला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांचे अनमोल योगदान आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांचा त्यांनी सतत पाठपुरावा केला होता. पोलीस पाटलांचा मानसन्मान मिळवून देणे, पोलीस पाटील यांच्या सुखदुःखात सहभागी होणे अशा अनेक विषयांसाठी त्यांचे नेहमीच योगदान लाभत आहे. भविष्यातही त्यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस पाटील संघाला सहकार्य मिळत राहील, असे त्यांनी बोलताना सांगितले. Chavan’s election as state member

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, सचिव कमलाकर मांगले, रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ अध्यक्ष विश्वनाथ पाटील, गुहागर तालुका अध्यक्ष सुधाकर खेतले (कुटगिरी), उपाध्यक्ष स्वप्निल बारगोडे (वेळब), सचिव अरविंद पड्याल ( वेलदुर), खजिनदार भक्ती गद्रे (पालशेत मारुती मंदिर ), उपसचिव अनिल घाडे (वेळंब घाडेवाडी), उपखजिनदार विशाल बेलवलकर ( शृंगारतळी), सल्लागार महादेव सोलकर (मढाळ), सोनू साळवी (पेवे खरेकोडं), प्रकाश आंबोकर (निगुंडळ), किरण धनावडे (मुंढर), उदय असगोलकर (असगोली) व सर्व पोलीस पाटील यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Chavan’s election as state member
