• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकण रेल्वेचा वेग मंदावणार

by Guhagar News
May 29, 2026
in Guhagar
710 7
0
Changes to Konkan Railway Schedule
1.4k
SHARES
4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : कोकण रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांचा प्रवास जून महिन्यापासून अधिकृतपणे मंदावणार आहे. कोंकण रेल्वेवर १५ जून ते २० ऑक्टोबरदरम्यान पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. घाटमार्ग तसेच संभाव्य दरड कोसळण्याच्या भीतीमुळे प्रवासी सुरक्षिततेच्या कारणास्तव कोकण रेल्वेवर वेगमर्यादा लागू करण्यात येते. त्यामुळे वेळांमध्ये बदल होतो. पावसाळी वेळापत्रकामुळे कोकणकन्या, तेजस, जनशताब्दी, मांडवी, मत्स्यगंधा आणि मंगळुरू एक्स्प्रेस यांच्या प्रवासवेळेवर परिणाम होणार आहे. Changes to Konkan Railway Schedule

मुंबई-गोवा रेल्वेमार्गावरील गाडी क्र.२२२२९/३० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारतसह अन्य प्रमुख गाड्या पावसाळी वेळापत्रकात आठवड्यातून तीन दिवस धावणार आहेत. सध्या वंदे-भारत सहा दिवस धावत आहे. प्रतिष्ठित (१२४३१/२) हजरत निजामुद्दीन तिरुअनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीनसह एकूण ४४ मार्गांवरील ८८ रेल्वेगाड्यांवर पावसाळी वेळापत्रकाचा परिणाम होणार आहे. यात जनशताब्दी, तेजस, दुरांतो, मत्स्यगंधा, हमसफर, मांडवी, मरूसागर, कोकणकन्या, तुतारी, गोवा संपर्क क्रांती या गाड्यांचा समावेश आहे. Changes to Konkan Railway Schedule

रोहा वीर दरम्यान ४७ किमी अंतरावर ताशी १२० किमी, वीर ते कणकवली २६९ किमी अंतरावर ७५ ते १२० किमी, कणकवली-उडुपी ३७७ किमी अंतरावर ९० ते १२० किमी आणि उडुपी ते ठोकूर ४७ किमी अंतरावर ताशी १२० किमी वेगमर्यादा आहे. संपूर्ण मार्गासाठी ७५ किमी अशी वेगमर्यादा राहणार आहे. पावसाळ्यात कोकणात तीव्र मुसळधार पावसाची शक्यता असते. यामुळे प्रवासी सुरक्षेच्या कारणास्तव मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात चार महिन्यांच्या कालावधीसाठी बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी पावसाळी वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले. Changes to Konkan Railway Schedule

Tags: Changes to Konkan Railway ScheduleGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share558SendTweet349
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.