दि. 25/09/2023 रोजी ग्रामिण रुग्णालय, गुहागर
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू- भगिनींना कळविण्यात येते की, समाज कल्याण विभागतर्फे दिव्यांगांच्या दारी या उपक्रमाअंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबीर घेण्यात येणार आहे. हे दिनांक 23/09/2023 रोजी घेण्यात येणारे शिबीर सोमवार दि. 25/09/2023 रोजी ग्रामिण रुग्णालय, गुहागर येथे घेण्यात येणार आहे. तरी शिबिराच्या नियोजनात झालेल्या बदलाची ही माहिती गुहागर तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत पोहचवावी. Changes in the planning of Divyang camp


सदर शिबिरामध्ये मूकबधिर व कर्णबधिर दिव्यांग वगळता इतर सर्व प्रकारच्या दिव्यांगांची तपासणी होणार आहे. तरी अजुनही ज्या दिव्यांगांनी दिव्यांग प्रमाणपत्र काढलेले नाही. त्यांनी सदर शिबिरामध्ये जाऊन आपली तपासणी करुन दिव्यांग प्रमाणपत्र काढावे. तसेच ज्या दिव्यांगाचे सर्टिफिकेट काढ़ायचे आहे त्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये जावून रजिस्ट्रेशन करावे. Changes in the planning of Divyang camp


तरी ही माहिती जास्तीत जास्त दिव्यांगापर्यंत पोचवून सहकार्य करा. असे आवाहन गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या अध्यक्षांनी केले आहे. Changes in the planning of Divyang camp