राजेश बेंडल, मतदारांच्या हक्काचा प्रतिनिधी व्हायला आवडेल
गुहागर, ता. 15 : विरोधकांवर टिकाटिप्पणी न करता सर्व जातीधर्माच्या जनतेला समान न्याय, समान संधी आणि सर्वांगिण विकास या त्रिसुत्रीचा लाभ मिळण्यासाठी काम करायचे. हे माझे राजकारणातील उद्दीष्ट राहीले आहे. आज गुहागर विधानसभा मतदारसंघात प्रवास करताना येथील जनतेला परिवर्तन हवे आहे हे मी अनुभवत आहे. त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित आहे. Change will happen in Guhagar
प्रश्र्न : कोणते मुद्दे घेवून विधानसभेची निवडणूक लढवत आहात.
उत्तर : माझी राजकीय किर्द पंचायत समिती सदस्य म्हणून सुरु झाली. त्यानंतर पंचायत समितीचा उपसभापती, सभापती, गुहागर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष होण्याची संधीही मिळाली. राजकीय क्षेत्रात काम सुरु करताना माझे ध्येय सर्वांगिण विकासाचे राहीले. सर्व जातीधर्माच्या जनतेला समान न्याय, समान संधी मिळाली पाहीजे. प्रत्येक गावाचा सर्वांगिण विकास झाला पाहीजे. यासाठी मी आग्रही राहीलो. आता विधानसभेची निवडणूक लढवितानाही माझे ध्येय उद्दीष्ट हेच आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावाला विकास म्हणजे काय अभिप्रेत असते तर उत्तम रस्ते, पुरेसे आणि वेळेवर पाणी घरादारापर्यंत यावे, अखंडीत वीज, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सुविधा. सामान्य जनतेचे हे प्रश्र्न प्राधान्याने सोडविण्यावर माझा भर राहील. या प्रक्रियेत सर्वांना सोबत घेवून मी काम करणार आहे. त्याचबरोबर सर्व जातीधर्माच्या लोकांचे काही प्रश्र्न असतात ते सोडविण्यासाठी प्रयत्न करेन. विधानसभेचा प्रचार करताना माझे ध्येय लोकांना सांगतानाच महायुतीने केलेली कामे, वचननाम्यात सांगितलेली आश्र्वासने असे सर्व मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. Change will happen in Guhagar
प्रश्र्न : आमदार जाधव आक्रमकपणे बोलतात, समोरच्याला आपल्या भाषणातून घेरतात त्याला आपण कसे उत्तर देत आहात.
उत्तर : आजवरच्या राजकीय जीवनात मी कधीच कोणावरही टिकाटिप्पणी केली नाही. ते माझ्या तत्त्वात बसत नाही. आक्रस्ताळपणाने बोलून, दुसऱ्यावर आरोप, टिका करुन काहीही साध्य होत नाही. उलट त्यातच शक्ती आणि बुद्धी खर्ची होते. त्यामुळे आमदार जाधवच नव्हेतर अन्य कोणीही कितीही आरोप केले तरी मी त्यांच्यावर टिका करणार नाही. Change will happen in Guhagar
प्रश्र्न : आपल्याला उमेदवारी देताना बहुसंख्येने असलेल्या कुणबी समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा एक विचार होता. आता या समाजाकडून आपल्याला अपेक्षित समर्थन मिळत आहे का.
उत्तर : मी ज्या समाजात जन्मला आलो त्या समाजाचा मला अभिमान आहे. गेली 30 वर्ष या समाजाला सोबत घेवूनच मी माझे सामाजिक काम सुरु ठेवले. आज अनेक वर्षानंतर या समाजाला प्रतिनिधीत्व मिळत आहे ही आनंदाची बाब आहे. कर्तव्य भावनेने या समाजाचे प्रश्र्न सोडविण्यासाठी थोडे अधिकचे प्रयत्न मी करणार आहे. स्वाभाविकपणे समाजातील कार्यकर्ते, संस्था यांच्याद्वारे समर्थनासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना यशही मिळतयं. त्याचबरोबर सर्व जाती धर्मामधुनही समर्थन मिळत आहे. इथे असलेल्या सर्व जनतेचा प्रतिनिधी होणे मला अधिक आवडेल. राजेश बेंडल हा आमचा हक्काचा माणुस आहे ही भावना सर्व समाज घटकांच्या मनात रुजावी ही माझी भुमिका आहे. Change will happen in Guhagar
प्रश्र्न : गावागावातून शहराकडे वळणाऱ्या तरुण तरुणींना इथेच रोजगार देण्यासाठी आपले काय नियोजन आहे.
उत्तर : भौतिक सुविधांबरोबर रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या पाहीजेत यासाठी आग्रही असलेच पाहीजे. परंतु केवळ रोजगाराच्या बढाया मारायच्या, आश्र्वासने द्यायची. असे करणारा मी कार्यकर्ता नाही. जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आली पाहीजे. बागायतीमधून, बारमाही शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळाले पाहीजे. या गोष्टी केल्यातरच इथला तरुण वर्ग पुन्हा शेतीकडे वळेल. निसर्गसंपन्न असलेल्या मतदारसंघात पर्यटन उद्योग वाढला तर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. त्यासाठी पर्यटनस्थळांचा पायाभुत विकास करावा लागेल. याशिवाय प्रदुषणमुक्त पर्यावरणपुरक उद्योग इथे आले पाहीजेत. भौतिक आणि पायाभुत सुविधांचा विकासामुळे स्वाभाविकपणे इथल्या जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. Change will happen in Guhagar
प्रश्र्न : प्रचारामध्ये महायुतीतील घटक पक्षांची साथ मिळते आहे का. विशेषकरुन भाजपच्या प्रचारातील सहभागाबददल काय सांगाल.
उत्तर : उमेदवारी अर्ज भरल्यापासून महायुतीतील सर्व घटकपक्षांचे कार्यकर्ते मनापासून प्रचारात कार्यात सहभागी आहेत. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे देखील महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. उमेदवारी अर्ज भरतानाही भाजपचे काही पदाधिकारी सोबत होते. शेवटी प्रत्येक पक्षाला एक राजकीय भूमिका घ्यावी लागते. समन्वय समितीच्या बैठकी होईपर्यंत थांबल्याचे, त्यानंतर मध्यंतरी एका वक्तव्यामुळे उडालेल्या गोंधळानंतर भाजपचे कार्यकर्त्यांनी प्रचार थांबविल्याचे लोकांसमोर आले. प्रत्यक्षात तसे नव्हते. महायुतीच्या प्रमुख नेत्यांचा उत्तम समन्वय, संवाद आहे. प्रामाणिकपणे त्यांच्या वरिष्ठांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे भाजप काम करत आहे. माजी आमदार डॉ. विनय नातू हे अनेक सभांना उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी डॉ. सौ. विनिता नातू या देखील वाडीवस्तीवर जावून संपर्क करत आहेत. Change will happen in Guhagar
प्रश्र्न : निवडणुकीचा निकाल आपल्या बाजुने लागेल असा विश्र्वास वाटतो का ?
उत्तर : महायुतीचा विजय होणार याबद्दल कोणतीही शंका नाही. कारण या मतदारसंघातील जनतेला परिवर्तन हवयं. त्यांनी तसा निर्धार केलाय. त्यामुळे चांगल्या मताधिक्याने मी विजयी होईन. Change will happen in Guhagar